माधव जूलियन - आगगाडी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द जीवनलहरी]
धडाड धडड
खडाड खडाड
धावते ही गाडी
केवढी धडाडी !
खाऔन रगड
काजळी दगड
पाण्याचे रान्जण
घोटांत पिऔन
फुस्त्फुसे नागीण
वार्याची बहीण १०
तोण्डाने जळते
सर्वाङग वळतें
पाठीचे मणके
पोकळ टणके
टाकिते तोडुन
घेतेहि जोडून
माणसें पोटांत
बसती थाटांत
धावे ही अगीन -
गाडीची नागीण २०
डोङगर - बिळांत
शिरून पळत
नदीला ओलाण्डी
न जाय झोकाण्डी
पुलाची घर्घर
टाकून सत्वर
खडाड खडाड
धडाड धडाड
धडाड धडाड
दूर हो वाघीण
अशी ही नागीण ३०
फोडून किञ्चाळी
बसवी काण्ठाळी
धुराचा फवारा
झेण्डयाचा फरारा
काजळी हवेंत
प्रवाह समेत
दिवसां दुपारीं
रात्रीच्या अन्धारीं
थण्डींत वार्यांत
पाऔस पाण्यांत. ४०
करीत फुम्पाट
धावते अचाट
रात्रींच्या प्रहरीं.
शोभे ही सुन्दरी
खालती तुटला
तारा हा कुठला ?
राङगेने वाटती
काजवे धावती
डोळ्यांत या गोल
विजेचा कल्लोळ ५०
ही आली थाम्बली
माणसें धावलीं
तांबडा तो दिवा
झालाच हिरवा
ऐटीने ऐञ्जीन
कधी मी हाकीन ?
वाटेंत फाटक
करितें अटक
वाजली ही शीट -
परन्तु तिकीट ! ६०
ता. १६ सप्टेम्बर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP