मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
वलून बघस नाही!

गौरीची गाणी - वलून बघस नाही!

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


वलून बघस नाही!
पाण्याचे देडकुली का ग बोलस नाही?
-माझे पायाला पट्ट्या नाही
तरी मेल्या वलून बघस नाही!

पाण्याचे देडकुली का ग बोलस नाही?
-माझे हातात बांगड्या नाही
तरी मेल्या वलून बघस नाही!

पाण्याचे देडकुली का ग बोलस नाही?
-माझे गल्याला गाठी नाही
तरी मेल्या वलून बघस नाही!

पाण्याचे देडकुली का ग बोलस नाही?
-माझे उरीला चोली नाही
तरी मेल्या वलून बघस नाही!

पाण्याचे देडकुली का ग बोलस नाही?
-माझे कमरेला साडी नाही
तरी मेल्या वलून बघस नाही!

वळून बघितले नाहीस!
पाण्यातले बेंडकोळी, का ग बोलत नाहीस?
माझ्या पायांत पैंजण नाहीत,
तरी मेल्या वळून बघितले नाहीस!

पाण्यातले बेंडकोळी, का ग बोलत नाहीस?
माझ्या हातांत बांगड्या नाहीत,
तरी मेल्या वळून बघितले नाहीस!

पाण्यातले बेंडकोळी, का ग बोलत नाहीस?
माझ्या गळ्य़ात माळ नाही,
तरी मेल्या वळून बघितले नाहीस!

पाण्यातले बेंडकोळी, का ग बोलत नाहीस?
माझ्या उराला चोळी नाही,
तरी मेल्या वळून बघितले नाहीस!

पाण्यातले बेंडकोळी, का ग बोलत नाहीस?
माझ्या कंबरेला साडी नाही,
तरी मेल्या वळून बघितले नाहीस!

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP