मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
दूरी जाय

गौरीची गाणी - दूरी जाय

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


कंबल दूरी दूरी जाय
सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली मुर्‍या मुर्‍या पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली डोफ़ा डोफ़ा पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली कंबरभर पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली सातीभर पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली गळ्याभर पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

सखू गेली वराले तल्या ग
सखू उतरली डोक्याभर पाण्या ग
कंबल दूरी दूरी जाय....

कमळ दूर दूर जाई
सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली पाऊलभर पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली गुडघ्याभर पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली कंबरभर पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली छातीभर पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली गळाभर पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

सखू गेली वरच्या तळ्याला ग
सखू उतरली डोक्याइतक्या पाण्यात ग
कमळ दूर दूर जाई....

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP