गौरीची गाणी - दुष्काल
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दुष्काल
घाटव्रून उतरला जोगी
गेला राजाचे नगरला
सीता पाणी पाज ग मला
सीता पाणी पाज ग मला
अन्नादाण्याचा सुकाल जोग्या
पाण्याचा दुष्काल
हात घातीला झोलन्यात
काढीलं चोख तांदूल
मुठी फ़ेकील्या बावडीला
मुठी फ़ेकील्या तलीयाला
बावडी भरुनीशा आल्या
तली भरूनीश आल्या
पाण्या निघाल्या नगरच्या नारी
दुडी भरूनी आणिल्या
दुष्काळ
घाटावरून उतरला जोगी
गेला राजाच्या नगराला
सीते, पाणी पाज ग मला
सीते, पाणी पाज ग मला
अन्नादाण्याचा सुकाळ, जोग्या
पाण्याचा दुष्काळ
हात घातला झोळीत
काढले स्वच्छ तांदूळ
मूठभर फ़ेकले विहिरींकडे
मूठभर फ़ेकले तळ्यांकडे
विहिरी पाण्याने भरुन आल्या
तळी पाण्याने भरून आली
पाण्याला निघाल्या नगरातील नारी
त्यांनी घागरी भरून आणल्या
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP