पाच पानांचा इडा
नागवेल तासाला पेरीली, ना येलीवं ना येलीवं
नागवेल आली एखा पानावं, ना येलीवं ना येलीवं
नागवेल आली दोन पानावं, ना येलीवं ना येलीवं
नागवेल आली तीन पानावं, ना येलीवं ना येलीवं
नागवेल आली चार पानावं, ना येलीवं ना येलीवं
नागवेल आली पाच पानावं, ना येलीवं ना येलीवं
पाच पानाचा केला इडा, ना येलीवं ना येलीवं
सुपारी तुझी आईबाई, ना येलीवं ना येलीवं
चुना तुझी भरतारु, ना येलीवं ना येलीवं
कात तुझा मैतरु, ना येलीवं ना येलीवं
पाच पानांचा विडा
नागवेल बांधावर पेरली, त्या वेलीवर ग...
नागवेलीला आले एक पान, त्या वेलीवर ग....
नागवेलीला आले दोन पान, त्या वेलीवर ग....
नागवेलीला आले तीन पान, त्या वेलीवर ग....
नागवेलीला आले चार पान, त्या वेलीवर ग....
नागवेलीला आले पाच पान, त्या वेलीवर ग....
पाच पानांचा विडा केला, त्या वेलीवर ग..
सुपारी तुझी आईबाई, त्या वेलीवर ग..
चुना तुझा भ्रतार ग, त्या वेलीवर ग..
कात तुझा मैतार ग, त्या वेलीवर ग..