गौरीची गाणी - गोठ्यातली गायी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गोठ्यातली गायी
आपु बाये एकेका मायेच्या वो
पडला बाये अंगावरी हातू
धरीन मेल्यानं उजवे मनगटालं रं
जोगी मेला नाही ऐकतू रं
दीन मेल्यालं गोठ्यातली गायी रं
नको मला गोठ्यातली गायी रं
गोठ्यातली गाय
आपण बाई, एकाच आईच्या लेकी
(म्हणून माझे दुःख तू जाणू शकशील)
टाकला त्याने माझ्या अंगावर हात...
-धरीन मेल्याचे उजवे मनगट
-तरी जुमानणार नाही तो जोगी तुला
-देईन मेल्याला गोठ्यातली गाय
-नको मला गोठ्यातली गाय...
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP