गौरीची गाणी - अस्तुरी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
अस्तुरी
पुलावर खेळं चांगुणा
खेळता सुपली हरवली ग
तिकून आला गायकेदादा
-माझी सुपली दे रं गवसूनी रं
-होशिल हा अंगाची अस्तुरी गं
तवा दे नं सुपली गवसूनी गं
-हलकट मेल्या पापी चांडाळा
नाय होत अंगाची अस्तुरी रं
नको देव सुपली गवसूनी रं
जावून सांगन आयेला, आयेला रं
जावून सांगन बापाला, बापाला रं
नेईन पाटलाचे ओटीला, ओटीला रं
सांगन तुला मी कुटाया, कुटाया रं
(कुटणे-मारणे)
अस्तुरी
पुलावर खेळते चांगुणा
खेळताना सूप हरवले
तिकडून आला गुराखीदादा
-माझे सूप दे शोधूनी रे
-होशील का अंगाची अस्तुरी ग
तर देईन सूप शोधूनी ग
-हलकट मेल्या पापी चांडाळा
नाही होत अंगाची अस्तुरी रे
नको देऊ सूप माझे शोधूनी रे
जाऊन सांगेन आईला, आईला रे
जाऊन सांगेन बापाला, बापाला रे
नेईन तुला पाटलाच्या ओट्यावर
सांगन मी तुला मारायला रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP