गौरीची गाणी - इनवा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
इनवा
सेतकडीला इनवा लागला ग s
माझ्या बाबाला कुणीतरी कलवा ग s
झारी भरूना पाणी बोलवा ग s
सेतकडीचा इनवा इझवा ग s
सेतकडीला इनवा लागला ग s
माझ्या आईला कुणीतरी कलवा ग s
झारी भरूना पाणी बोलवा ग s
सेतकडीचा इनवा इझवा ग s
वणवा
माझ्या शेताला वणवा लागला ग
माझ्या बाबाला कुणीतरी कळवा ग
झारी भरून पाणी बोलवा ग
माझ्या शेताचा वणवा विझवा ग
माझ्या शेताला वणवा लागला ग
माझ्या बाबाला कुणीतरी कळवा ग
झारी भरून पाणी बोलवा ग
माझ्या शेताचा वणवा विझवा ग
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP