गौरीची गाणी - वाटणी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वाटणी
चाली ग चाली चांगुना, चाली ग चाली चांगुना
किती मी चालू मामोजी, किती मी चालू मामोजी
बहीन गेली भावाचे पाव्हन्या
-दे रं भावा अर्धेली म्हसी...
दे रं भावा अर्धेली गायी...
-म्हसीची बात नको बोलू, गायीची बात नको बोलू !
बहीन तं रागा भरली
-देईन तुला थाली ग तांब्या!
-नको मला थाली रंतांब्या,
डोंगरी आपुली सेतां पिकली
गरवेली भातां
दे रं भावा अर्धेली भातां....
दे रं भावा अर्धेली सेतां....
-भातांची बात नुको बेलू, सेतांची बात नुको बेलू१
बहीन तं रागा भारली
-देईन तुला गाठी ग बांगडी!
-नको मला गाठी रं बांगडी!
दोन तीन दिस झालं, दोन तीन दिस झालं
भाव गेला बहिनीचे पाव्हन्या
बंधूला जेवाचं वाढेला
भरताराला पुरनपोळ्या, बंधूला इखाच्या वड्या
भाव तिचा मरून गेला!
(गरवेली-गर्भारली,दाणे भरले)
वाटणी
चाल चाल ग चांगुणा, चाल चाल ग चांगुणा
किती चालू मी मामंजी, किती चालू मी मामंजी
बहीण गेली भावाकडे पाहुणी
-दे रे भावा मला अर्ध्या म्हशी
दे रे भावा मला अर्ध्यी गायी...
-म्हशींची गोष्ट नको काढू, गायींची गोष्ट नको काढू!
बहीण तर मग रागावली
-देईन तुला ग थाळीतांब्या!
-नको मला रे थाळीतांब्या,
डोंगरी आपली शेते पिकली,
भाताची शेते दाण्यांनी भरली
दे रे भावा मला अर्धे तांदूळ....
दे रे भावा मला अर्धी शेते...
तांदळाची गोष्ट नको काढू, शेतांची गोष्ट नको काढू!
बहीण तर मग रागावली
-देईन तुला कंठी बांगडी
-नक माला रे कंठी बांगडी!
दोन तीन दिवस झाले, दोन तीन दिवस झाले
भाऊ गेला बहिणीकडे पाहुणा
भावाला जेवायला बाढले
भ्रताराला पुरणपोळ्या, भावाला विषाच्या वड्या...
भाऊ तिचा मरून गेला!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP