गौरीची गाणी - रजा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
रजा
सडीकू तांदलाचा घातला मी शैघाना
एक घाऊ मारिते मी मुलारी वाट पाहते
आलास रे बंधुराया बसा बाजंवरी
पायातली किरमिर जोडे ठेवा वाटंचरी
हातातली घोलकाठी ठेवा डांडीवरी
डोईचा मुंडासां ठेवा पावक्यावरी
एके हाती तांब्या बहीण धुवती पाऊला
आसोल्या रडते, कुणी बहिणी रागीला
कुणी बहिणी गातीला
सातजण दिरू नाझे नवजणी नंदाणा
एवढ्याची काचणी मी किती काढू बंधवा
जा बांधू राजा माग माझे सासर्यागोठी
दे मामा रजा माझ्या गिरजा बहिणीला
नयं मिलं रजा तुझ्या गिरजा बहिणीला
जा बांधू राजा माग माझे सासूगोठी
दे मामी रजा माझ्या गिरजा बहिणीला
नयं मिलं रजा तुझ्या गिरजा बहिणीला
जा बांधू राजा माग माझे दिराचेजवली
दे भावो रजा माझ्या गिरजा बहिणीला
नयं मिलं रजा तुझ्या गिरजा बहिणीला
जा बांधू राजा माग माझे नंदुलीजवली
दे मेव्हणे रजा माझ्या गिरजा बहिणीला
नयं मिलं रजा तुझ्या गिरजा बहिणीला
जा बांधू राजा माग माझे भरताराजवली
दे भावो रजा माझ्या गिरजा बहिणीला
दीड दिवसाची रजा तुझ्या गिरजा बहिणीला
रजा
तांदूळ धुवून वाळवले, उखळात घाणा घातला
एक घाव घालते, मी मुळार्याची वाट पाहते
आलास रे बंधुराया, बस बाजेवर
पायातले वाजणारे, जोडे ठेव वाटेवर
हातातली घुंगुरकाठी, ठेव खांबाजवळ
डोईचे मुंडासे, ठेव बाजेच्या पायावर
एका हाती तांब्या, बहीण धुते पाऊले
डोळ्यांत आसवे...काही बहिणी असतील रागावलेल्या,
काही बहिणी असतील गाणी गात...
सातजण माझे दीर, नऊ माझ्या नणंदा
एवढ्यांचा जाच मी कसा सोसू भावा....
जा बंधू, रजा माग माझ्या सासर्याजवळ
दे मामा रजा माझ्या गिरिजा बहिणीला
नाही मिळणार रजा तुझ्या गिरिजा बहिणीला
जा बंधू, रजा माग माझ्या सासूजवळ
दे मामी रजा माझ्या गिरिजा बहिणीला
नाही मिळणार रजा तुझ्या गिरिजा बहिणीला
जा बंधू, रजा माग माझ्या दिराजवळ
दे भावा रजा माझ्या गिरिजा बहिणीला
नाही मिळणार रजा तुझ्या गिरिजा बहिणीला
जा बंधू, रजा माग माझ्या नणंदेजवळ
दे मेव्हणे रजा माझ्या गिरिजा बहिणीला
नाही मिळणार रजा तुझ्या गिरिजा बहिणीला
जा बंधू, रजा माग माझ्या भ्रताराजवळ
दे भावा रजा माझ्या गिरिजा बहिणीला
दीड दिवसाची रजा तुझ्या गिरिजा बहिणीला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP