मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
वेण्या

गौरीची गाणी - वेण्या

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


वेण्या
शेताची ढेपां पाडेली ग
ढेपांचा बांधू बांधेला ग
बांधावं कौला जलमेला ग
दोन बाजुनं, चाले आगीनगाडी ग
त्याच्यात गणपती देवू ग

-देवा तू कुठे चालेला?
-मी चाललो वसई शहराला,
वेण्या आणायला...

वेण्या आणल्या बारीक कळ्यांच्या,
ग माझ्या मनाच्या!
(कौला-एक पालेभाजी)

वेण्या
शेतात ढेकळं फ़ोडली ग
ढेकळांचा बांध बांधला ग
बांधावर कौला उगवला ग
दोन रूळांवर चालते आगगाडी ग
तिच्यात गणपती देव ग

-देवा, तू कुठे चाललास?
-मी चाललो वसई शहराला,
वेण्या आणायला...

वेण्या आणल्या नाजूक कळ्यांच्या...
ग माझ्या आवडीच्या

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP