गौरीची गाणी - आली ग बहीण
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
आली ग बहीण
आली गं बहीण माझी पाव्हण्या
देस गं माझ्या बहीणीला पाणी....
कुठूनचं देऊ मी पाणी, रात्री बावडी गेल्या आटूनी!
आली गं बहीण माझी पाव्हण्या
देस गं माझ्या बहीणीला पाट....
कुठूनचा देऊ मी पाट, रात्री सुतार गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाव्हण्या
देस गं माझ्या बहीणीला चोली....
कुठूनची देऊ मी चोली, रात्री शिंपी गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाव्हण्या
देस गं माझ्या बहीणीला बांगड्या....
कुठूनच्या देऊ मी बांगड्या, रात्री कासार गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाव्हण्या
देस गं माझ्या बहीणीला पट्ट्या....
कुठूनच्या देऊ मी पट्ट्या, रात्री सोनार गेला पलूनी!
आली ग बहीण...
आली गं बहीण माझी पाहुणी
दे गं माझ्या बहिणीला पाणी...
कुठले देऊ मी पाणी, रात्री विहिरी गेल्या आटूनी!
आली गं बहीण माझी पाहुणी
दे गं माझ्या बहिणीला पाट...
कुठले देऊ मी पाट, रात्री सुतार गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाहुणी
दे गं माझ्या बहिणीला चोळी...
कुठले देऊ मी चोळी, रात्री शिंपी गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाहुणी
दे गं माझ्या बहिणीला बांगड्या...
कुठले देऊ मी बांगड्या, रात्री कासार गेला पलूनी!
आली गं बहीण माझी पाहुणी
दे गं माझ्या बहिणीला पैंजण...
कुठले देऊ मी पैंजण, रात्री सोनार गेला पलूनी!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP