गौरीची गाणी - जन्माचा सोबती
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
जन्माचा सोबती
गंगू तुझा नवरा बारीकू बारीकू गं
गंगू तुझा नवरा बारीकू...
असू दे बारीक बिरकू गं,बिरकू गं
असू दे बारीक बिरकू...
जाईन दुधाले आलीला, आलीला गं
जाईन दुधाले आलीला...
आणीन पैशाचा दुधसला, दुधसला गं
आणीन पैशाचा दुधसला...
तरी माझे धन्याला वाढवीन, वाढवीन गं
तरी माझे धन्याला वाढवीन...
करीन जन्माचा सोबती, सोबती गं
करीन जन्माचा सोबती!
जन्माचा सोबती
गंगू तुझा नवरा तुझ्याहून लहान ग
किती लहान ग....
असू दे माझ्याहून लहान ग
कितीही लहान ग....
मी जाईन गवळ्याच्या गल्लीत ग
जाईन दुधाला गल्लीत...
आणीन मी पैशाचे दूध ग
आणीन पैशाचे दूध....
असे माझ्या धन्याला वाढवीन ग
असे धन्याला वाढवीन;
करीन माझ्या जन्माचा सोबती ग
करीन जन्माचा सोबती ग!
वयाने लहान असलेल्या वराशी लग्न करण्याची पध्दत पूर्वीच्या काळी वारली जमातीत होती.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP