गौरीची गाणी - पाऊस
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पाऊस
तांबडे मालाला त्याने मेटा दिली
कुकुट उजळीला सूर्या खाकोळेला
अंधेरी पडेली मोरानं टाहो दिला
तोंडानं टाहो देतं बाये सोग्यानं पाणी पेतं
(उजळणे -आरवणे, सोगा-पिसारा.)
पाऊस
तांबड्या माळाहून त्याने हाक दिली
कोंबडा आरवला सूर्य झाकोळला
काळवंडले नभ, मोराने टाहो दिला
तोंडाने टाहो देतो बाई सोग्याने पाणी पितो
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP