गौरीची गाणी - संबरातू बाप
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
संबरातू बाप
माडीवंनी बाय् माडीs
बाय् तुला माडी बांधूनी कोणी दिली
हाय माझा बाप संबरातू
त्यानी मला माडी बांधूनी दिली
दुडीवंनी बाय् दुडीs
बाय् तुला दुडी बांधूनी कोणी दिल्या
हाय माझा आई संबरातू
तिन्ही मला दुडी घेऊनी दिल्या
तालेवार
माडीवरती बाई माडी
बाई तुल माडी बांधून कोणी दिली
आहे माझा बाप तालेवार
त्याने मला माडी बांधून दिली
घागरींवरती बाई घागरी
बाई तुल घागरी घेऊन कोणी दिल्या
आहे माझा आई तालेवार
त्याने मला घागरी घेऊन दिल्या
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP