गौरीची गाणी - गोंधाना
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गोंधाना
खेळत माळत गेलो वाड्याचे बाहेर
वाड्याचे बाहेर मी बांधाला जायते
बांधाला जायते मी गोंधाना पाह्यते
गोंधाना पाह्यता गोविंदा माझे मनगटी धरीला
-सोडं रं गोविंदा मी वैताक जईन
-वैताक जाशीन मी डोकं उडवीन
गोंदवणारा
खेळतफ़िरत गेले वाड्याच्या बाहेर
वाड्याच्या बाहेर जात होते बांधावर
बांधावर जात होते, शोधत गोंदवणारा
शोधता, गोविंदाने धरले माझे मनगट
-सोड रे गोविंदा मी माहेरी जाईन
-माहेरी जाशील तर मी तुझे उडवीन
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP