गौरीची गाणी - लाज
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
लाज
काली डबी काजलाची, पोर मालीन शोभे
दाराशी बसनारा, तुला लाज नय वाटे?
काली डबी काजलाची, पोर मालीन शोभे
दारू पेन्हारा, तुला लाज नय वाटे?
काली डबी काजलाची, पोर मालीन शोभे
पेऊन नाचनारा, तुला लाज नय वाटे?
लाज
काळी डबी काजळाची, पोर माळीण शोभते
दाराशी बसणार्या, तुला लाज नाही का वाटत?
काळी डबी काजळाची, पोर माळीण शोभते
दारू पिणार्या, तुला लाज नाही का वाटत?
काळी डबी काजळाची, पोर माळीण शोभते
पिऊन नाचणार्या, तुला लाज नाही का वाटत?
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP