गौरीची गाणी - गौराय येते
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गौराय येते
आरं तू माझे माली दादा
वाटंवं नारली लावू नको
गौराय येते. नारल खुडेते, वट्या भरीते
वाटं काय काय भंडारा फ़ेकीते
आरं तू माझे माली दादा
वाटंवं केलणी लावू नको
गौराय येते. केली खुडेते, वट्या भरीते
वाटं काय काय भंडारा फ़ेकीते
आरं तू माझे माली दादा
वाटंवं सोपार्या लावू नको
गौराय येते, सोपार्या खुडेते, वट्या भरीते
वाटं काय काय भंडारा फ़ेकीते
गौराई येते
अरे तू माझ्या माळी दादा
वाटेवर माड लावू नको
गौराई येते, नारळ खुडते, ओटी भरते
वाटेने काय काय भंडारा उधळते....
अरे तू माझ्या माळी दादा
वाटेवर केळी लावू नको
गौराई येते, केळी खुडते, ओटी भरते
वाटेने काय काय भंडारा उधळते....
अरे तू माझ्या माळी दादा
वाटेवर सुपार्या लावू नको
गौराई येते, सोपार्या खुडते, ओटी भरते
वाटेने काय काय भंडारा उधळते....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP