मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
वसईचा कोरट

गौरीची गाणी - वसईचा कोरट

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


वसईचा कोरट
वसईचा किल्ला किल्ला, किल्ला झाला ढिला ढिला रं
माझ्या गुलाबाच्या फ़ुला, मझ्या गुलाबाच्या फ़ुला रं

दर्या़च्या किनारीला बंधू माझा दारू रं दारू गाली
कोण मेला चहाड झाला बंधू माझा पकडून नेला रं
मागंपुढं चौघं पोलिस बंधू माझा मधी चालं रं
वसईचा कोरट मोठा बंधू माझा कोरटात नेला रं...

वसईचा कोरट पाहून बंधू माझा खलखल रडं रं
गल्यान् ची बोरमाल मोडीन बंधू माझा सोडवून आनीन रं...

वसईचे कोर्ट
वसईचा किल्ला किल्ला, किल्ला झाला आहे ढिला रे
माझे गुलाबाचे फ़ुला, ऐक माझे गुलाबाचे फ़ुला...

दर्याच्या किनारी भाऊ माझा दारू गाळतो रे
कोण मेला चहाडखोर झाला, भावाला पकडून नेले रे
मागेपुढे चौघे पोलिस भाऊ माझा मधून चाले रे
वसईचे कोर्ट मोठे, माझ्या भावाला कोर्टात नेले रे

वसईचे कोर्ट पाहून, भाऊ माझा खळखळ रडे रे
गळ्यातली बोरमाळ मोडेन, भावाला सोडवून आणेन रे.....

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP