गौरीची गाणी - वाजव बंधवा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वाजव बंधवा
वाजवा बांधवा बंदरी ढोलकी
नाचन बंधवा तुझे की ढोलकीवरी
धाकला दीर मला आलाय नियाला
बांधलाय बोसका सासर्या जायाला
बघ तरी बंधवा नदीला पूर आयलाय रं
दरीया बंधवा केवढा फ़ुललाय रं
आण तरी केवडा येणीला मालायाला
बघ रं बंधवा येणीला शोभून गेला
वाजव बंधवा
वाजवा बांधवा बंदरावर ढोलकी
नाचेन बंधवा तुझ्या ढोलकीच्या तालावर
धाकला दीर मला आलाय नेण्याला
बांधलेय गाठोडे सासरी जाण्याला
बघ तरी बंधवा नदीला पूर आलाय रे
दर्या बंधवा केवढा फ़ुललाय रे
आण तरी केवडा वेणीत माळायला
बघ रे बंधवा वेणीत शोभून दिसला
बंधवा-’बंधू’ चे संबोधन रूप
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP