रंगाला रंग दे
गेलो होतो, गेलो होतो, केवड्याचे बागा
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
पिवळे रंगाचा, दे माझा केवडा
गेलो होतो, गेलो होतो, केवड्याचे बागा
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
धवळे रंगाचा, दे माझा केवडा
गेलो होतो, गेलो होतो, केवड्याचे बागा
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
हिरवे रंगाचा, दे माझा केवडा
रंगाला रंग दे
गेलो होतो, आम्ही केवड्याच्या बागेत
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
पिवळ्या रंगाचा, दे माझा केवडा
गेलो होतो, आम्ही केवड्याच्या बागेत
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
ढवळ्या रंगाचा, दे माझा केवडा
गेलो होतो, आम्ही केवड्याच्या बागेत
रंगाला रंग दे, दे माझा केवडा
हिरव्या रंगाचा, दे माझा केवडा
रंगाला ’रंग’ देणे म्हणजे रंगाचे नाव सांगणे. हा एक प्रकारचा शच्दांचा/स्मरणशक्तीचा खेळ आहे. नाचत-गात असतानाच नाचणार्यांपैकी एकेकाने रंगाचे नाव सांगत गाणे वाढवत नेली जाते.