गौरीची गाणी - पलंगी बसे
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पलंगी बसे
करंटोलीचा ताना,ताना गं दिसतो निला
कमरेला साडी सोभे गं जाऊन पलंगी बसे
करंटोलीचा ताना,ताना गं दिसतो निला
पायाला पैंजण सोभे गं जाऊन पलंगी बसे
करंटोलीचा ताना,ताना गं दिसतो निला
हाताला बांगडी सोभे गं जाऊन पलंगी बसे
(करंटोली-एक वेल, ताना-वेल, करंटोलीचा ताना-नव्या नवरीसाठी वापरलेली प्रतिमा)
पलंगी बसे
करंटोलीचा वेल, वेल ग हिरवा दिसे
कंबरेला साडी शोभे, ग जाऊन पलंगी बसे
करंटोलीचा वेल, वेल ग हिरवा दिसे
पायाला पैंजण शोभे, ग जाऊन पलंगी बसे
करंटोलीचा वेल, वेल ग हिरवा दिसे
हाताला बांगडी शोभे, ग जाऊन पलंगी बसे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP