गौरीची गाणी - राया सुंदरा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
राया सुंदरा
तया होता गिरज्या सागू गं
तेयी सागाला आवट्या मारल्या गं
तोयी सागू का धरणी पाडीला गं
तेयी सागाचं ओंडं पाडीलं गं
तेयी ओंड्याचा फ़ल्या पाडील्या गं
तेयी फ़ल्यांची पेटी बनवली गं
त्यात बसविल्या राया सुंदरी गं
पेती दरीयात लोटूनी दिली गं
पेटी तरत बुडत चालली गं
पेटी माल्याचे मल्याला गेली गं
पेटी माल्यानी खोलून पाहिली गं
त्यां गवसल्या राया सुंदरा गं
पाहून माल्याला आनंद झाला गं
सुंदर राण्या
एक होता डोंगर साग ग
त्या सागावर घातले घाव ग
तो साग जमिनीवर पाडला ग
त्या सागाचे ओंडके कापले ग
त्या ओंडक्यांच्या फ़ळ्या पाडल्या ग
त्या फ़ळ्यांची पेटी बनवली ग
तीत बसवल्या सुंदर राण्या ग
पेटी दर्यात लोटून दिली ग
पेती तरंगत-बुडत चालली ग
पेटी माळ्याच्या मळ्याला गेली ग
पेटी माळ्याने उघडून पाहिली ग
त्याला मिळाल्या सुंदर राण्या ग
पाहून माळ्याला आनंद झाला ग
अशा स्वरूपात्च्या ’कथा’ सांगणारी अनेक गाणी वारली समाजात प्रचलित आहेत. मुलींना पोसणे जमले नाही म्हणून बापाने त्यांना पेटीत घालून समुद्रात लोटून दिल्याच्या कथा बर्याच सापडतात.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP