मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
धवले नंदीवरी

गौरीची गाणी - धवले नंदीवरी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


धवले नंदीवरी
धवले नंदीवरी गऊर भुकेली आली गं
नाही बापा भुकेलू- वाटं अमृता पिली गं

धवले नंदीवरी गऊर भुकेली आली गं
नाही बापा भुकेलू- वाटं भोजना केली गं

धवले नंदीवरी गऊर भुकेली आली गं
नाही बापा भुकेलू- वाटं भाकर खाल्ली गं

धवले नंदीवरी गऊर थकून आली गं
नाही बापा थकेलू- वाटं विश्रांती केली गं

धवळ्या नंदीवरी
धवळ्या नंदीवरून गौर भुकेली आली ग
नाही बापा मी भुकेली, वाटेत अमृत प्याले रे

धवळ्या नंदीवरून गौर भुकेली आली ग
नाही बापा मी भुकेली, वाटेत जेवण केले रे

धवळ्या नंदीवरून गौर भुकेली आली ग
नाही बापा मी भुकेली, वाटेत भाकर खाल्ली रे

धवळ्या नंदीवरून गौर थेकून आली ग
नाही बापा मी थकलेली, वाटेत विश्रांती घेतली रे

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP