गौरीची गाणी - सासरवाडीला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सासरवाडीला
आईबापाचा लेक लाडका सखे रामाचा
त्यानी छंद घेतला सासरवाडी जाण्याचा
आई म्हणे की नको जाय सासरवाडीला
तो असं म्हणता घोड्यावं सुवार झाला
सासर्यानी दूरून पाहिला
की जावाय पाव्हना आला
त्यानी दूरून रामराम केला
मेव्हण्यानी दूरून पाहिला
की भावजी पाव्हना आला
त्यानी दूरून रामराम केला
सासूनी दूरून पाहिला
की जावाय पाव्हना आला
तांब्या भरूनी पाणी दिला पावलां धुवायाला
मेव्हणीनी दूरून पाहिला
की भावजी पाव्हना आला
खांद्यावंचा टावेल दिला पावलां पुसायाला
बायकोनी दुरून पाहिला
का कोण हा भडवा आला
ती सांगं तिच्या सोद्याला
तुम्ही मारून टाका भडव्याला
(सोद्या-एक शिवी. इथे अर्थ-प्रियकर)
सासुरवाडीला
आईबापाचा लेक लाडका सखे रामाचा
त्याने नाद लावला सासूरवाडी जाण्याचा
आई म्हणे जऊ नको सासूरवाडीला
असे म्हणेपावेतो तो घोड्यावर स्वार झाला
सासर्याने दुरून पाहिले
की जावई पाहुणा आला
त्याने दुरून रामराम केला
मेव्हण्याने दुरून पाहिले
की भावजी पाहुणा आला
त्याने दुरून रामराम केला
सासूने दुरून पाहिले
की जावई पाहुणा आला
तांब्या भरून पाणी दिले पाय धुवायला
मेव्हणीने दुरून पाहिले
की जावई पाहुणा आला
खांद्यावरचा टॉवेल दिला पाय पुसायला
बायकोने दुरून पाहिले
की कोऊ हा भडवा आला
ती सांगे तिच्या सोद्याला
तुम्ही मारून टाका याला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP