गौरीची गाणी - गुंजावानी डोलं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गुंजावानी डोलं
काला निला पाखरू गुंजावानी डोलं
काला निला पाखरू गुंचावानी डोलं
त्याचे रं पायाला लाल लाल गोंडं
काला निला पाखरू गुंजावानी डोलं
त्याचे रं पाखाला लाल लाल गोंडं
काला निला पाखरू गुंजावानी डोलं
त्याचे रं टोहोकीत लाल लाल गोंडं
गुंजेवानी डोळे
गडद हिरवे पाखरू, त्याचे गुंजेवानी डोळे
गडद हिरवे पाखरू, त्याचे गुंजेवानी डोळे
त्याच्या रे पायाला लाल लाल गोंडे
गडद हिरवे पाखरू, त्याचे गुंजेवानी डोळे
त्याच्या रे पंखाला लाल लाल गोंडे
गडद हिरवे पाखरू, त्याचे गुंजेवानी डोळे
त्याच्या रे चोचीत लाल लाल गोंडे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP