गौरीची गाणी - डोला मारतो मेला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
डोला मारतो मेला
घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
पट्ट्या माझ्या चांदीच्या हां ग डोला मारतो मेला
घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
साडी माझी जरीची हां ग डोला मारतो मेला
घागर उतानी ग त्या रंगमाली तल्यावर
गाठी माझी सोन्याची हां ग डोला मारतो मेला
(रंगमाली तळे-ज्या तळ्यावर रंगढंग -शृंगारचेष्टा चालतात ते तळे)
डोळा मारतो मेला
घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
पैंजण माझे चांदीचे, हा ग डोळा मारतो मेला
घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
साडी माझी जरीची, हा ग डोळा मारतो मेला
घागर उतानी ग, त्या रंगीढंगी तळ्यावर
सरी माझी सोन्याची, हा ग डोळा मारतो मेला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP