गौरीची गाणी - कारवीटू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कारवीटू
काल्हईच्या आडीला ग चेंद्रे
कारवीटू माजेला ग चेंद्रे
असं ये पाटलाचं पोर ग चेंद्रे
अस्या या वारल्याच्या पोरी ग चेंद्रे
अस्या गवसायाला गेल्या ग चेंद्रे
असं गवसून काढलं ग चेंद्रे
कोनी सेंडीला धरीला ग चेंद्रे
कोनी केसाना धरीला ग चेंद्रे
त्याना चाबकाचा मार दिला ग चेंद्रे
त्याना उरफ़ाटं टांगेला ग चेंद्रे
त्याना मिरच्याची धुरी दिली ग चेंद्रे
त्याना पाह्या पडायला लावेला ग चेंद्रे
त्याना सोडून का दिला ग चेंद्रे
काल्हईच्या आडीला ग चेंद्रे
काळवीट
काल्हाई जाळीच्या मागे ग चंद्रे
काळवीट माजले असे ग चंद्रे
असे आले पाटलाचे कार्टे ग चंद्रे
जणू काळवीट भासले ग चंद्रे
अशा या वारल्याच्या पोरी ग चंद्रे
अशा त्याला शोधायला गेल्या ग चंद्रे
असे शोधून त्याला काढले ग चंद्रे
कोणी त्याच्या शेंडीला धरले ग चंद्रे
कोणी त्याच्या केसांना धरले ग चंद्रे
त्याला चाबकाचा मार दिला ग चंद्रे
त्याला झाडाला उलटा टांगला ग चंद्रे
त्याला मिरच्यांची धुरी दिली ग चंद्रे
त्याला पाया पडायला लावले ग चंद्रे
मगच त्याला सोडून दिले ग चंद्रे
काल्हाई जाळीच्या मागे ग चंद्रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP