गौरीची गाणी - मोहरीपावा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मोहरीपावा
घितली चुंभळ घितला टोपला
रायबाय गेली शेन मेलवाया
मेलवली शेना भरल्या पाट्या
ये रं गोविंदा उचलाया...
गोविंदा गेला उचलायाला
रायनं घितला मोहरीपावा....
राय ग राय, राय सुंदरी
दे गडे माझा मोहरीपावा....
येसील माझे घरापासी
मंग देन तुझा मोहरीपावा
गोविंदा गेला घरापासी
दे गडे रायी मोहरापावा....
येसील माझे दारापासी
मंग देन तुझा मोहरीपावा
गोविंदा गेला दारापासी
दे गडे रायी मोहसीपावा....
येसील माझे पलंगापासी
मंग देन तुझा मोहरीपावा
होसील माझा सखापती
मंग देन तुझा मोहरीपावा....
मोहरीपावा
घेतली चुंभळ घेतली टोपली
राहीबाई गेली शेण जमवण्या
जमवलं शेण भरल्या पाट्या
ये रे गोविंदा उचलण्या.....
गोविंदा गेला उचलण्या तर
राहीने घेतला त्याचा मोहरीपावा....
राही ग राही, राही सुंदरी
दे गडे माझा मोहरीपावा....
येशील माझ्या घरापाशी
मग देईन तुझा मोहरीपावा
गोविंदा गेला घरापाशी
दे गडे राही मोहरीपावा
येशील माझ्या दारापाशी
मग देईन तुझा मोहरीपावा
गोविंदा गेला दारापाशी
दे गडे राही मोहरीपावा
येशील माझ्या पलंगापाशी
मग देईन तुझा मोहरीपावा
होशील माझा सखापती
मग देईन तुझा मोहरीपावा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP