गौरीची गाणी - कामकाज
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कामकाज
आणते शेण सारवीते अंगणा
अंगणी तुलसा पुजते
डोईवं फ़ाट्या रानात जाते
घरी हो माझा तान्हा बाला
गायीचे पुढे वासरू सोडीला
गायीचे धार मी काढीते
बालाला दुधलां पाजीते
अंगणी तुलस पुजते
कामकाज
आण्ते शेण, सारवते अंगण
अंगणीची तुळस पूजते
सरपण आणण्या रानात जाते
घरी आहे माझे तान्हुले बाळ
गायीच्या पुढे वासरू सोडीते
गायीची धार मी काढीते
बाळाला दूध पाजीते
अंगणीची तुळस पूजते
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP