नजर
घाटावरूनी गं, वरूनी गं एक उतरला जोगी
त्याचा बिराडू गं, बिराडू गं चंदनाचे झाडाखाली...
शेना टाकीते गं, टाकीते गं भोईराची सून
तिची नंजर गं, नंजर गं गेली त्या जोग्यावरी...
हातचा टोपलां गं, टोपलां गं हातीया ठेवीला
धावत-धुवत गं, धावत गं गेली सासूचे जवली....
नको जाऊना गं, जाऊना गं घरातले लक्ष्मीये
तुला देईन गं, देईन गं, गल्यातला हार...
तुला देईन गं, देईन गं, पुतल्यांचा हार...
लेकींना देईन गं, देईन गं, कंबरचा करदोडा....
नजर
घाटावरून ग, एक उतरला जोगी
त्याचं बिर्हाड ग, चंदनाच्या झाडाखाली...
सडा टाकते ग, भोईराची सून
तिची नजर ग, गेली त्या जोग्यावर....
हातातली टोपली ग, खालती ठेवली
धावत-पळत ग, सासूजवळ गेली...
नको जाऊ ग, घरातल्या लक्ष्मी
तुला देईन ग, गळ्यातला हार...
तुला मी देईन ग, पुतळ्यांचा हार...
लेकिंना देईन ग, कंबरेचा कडदोरा....