गौरीची गाणी - मन
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मन
घाटावरून उतरला जोगी
जोग्याचे कमरेला भारी मोती
श्याण टाकते गंगूबाई
तिची नंजर जोग्यावं जाई
-आई, मी जाते जोग्यासंगा
-नको जाऊ ना लाडे लेकी
तुला मी देईन गायीम्हशी
-काय मा करू त्या गायीम्हशीलं
मन गेलाये जोग्यासंगे
(कसा-कंबरेची चंची)
मन
घाटावरून उतरला जोगी
जोग्याच्या कश्याला किंमती मोती....
सडा घालत होती गंगूबाई
तिची नजर जोग्यावर जाई
-आई, मी जाते जोग्यासोबत
-नको जाऊ ना लाडक्या लेकी
तुला मी देईन गायीम्हशी
-काय मी करू त्या गायीम्हशींचे
मन माझे गेलेय गोग्यासंगे.....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP