मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
तिसर्‍या रघूजी भोसल्याचा पोवाडा

तिसर्‍या रघूजी भोसल्याचा पोवाडा

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


आज रघुराज, भले रंगिले महाराज, केला वाघोडयाचा साज कोठे नाही असा ॥ भली रंगाची बहार बंगले केले हो तयार भवते खांब सुरु दार पहा खूप तर्‍हा ॥ शोभे रंग पिवळा लाल, वर उडतो गुलाल, भाट जर्जति हवाल, पहा झोक बरा ॥ लोक उभे आसपास, म्हणती कारागीर शाबास, धन्य श्रीमंती विलास, नाही न्यून जरा ॥ किती वर्णावें तें धाम ॥ होतो पाहता आराम ॥ जसा अयोध्येचा राम रघुराज असा ॥(चाल)॥ तरुण वयामध्ये अरूण जसे ॥ दिव्य प्रभा फांकली असे ॥ सरदार भोळे राव जसे ॥ केला स्थळोस्थळीं थाट, उभा मुत्सद्यांचा दाट, केला लौकिकीं बोभाट पुण्यापावेतो ऐसा ॥१॥

आता ऐका सिल्लेखाना ॥ स्वाधीन गिरमाजीचे जाणा ॥ आणि जामदारखाना ॥ बापूजी जामदार ॥ आता हुजरात पागा खाशी ॥ त्यांत दाजीबा विलासी ॥ नाही उपमा तयासी ॥ पहा मोठे जामदार ॥ आता शिरारा महाल कोठी ॥ त्यांत तात्याची हातोटी ॥ लौकिकाची कीर्ति मोठी ॥ नाही असे कामदार ॥ दुसरा संगीखाना फार ॥ किती वर्णू वारंवार ॥ करी विठोबा विचार पहा पूर्व ग्रामदार ॥ चाल ॥ शिकारखाना पहा बरवा गाडीखान्याची तेजी हवा ॥ बापू दैवत्या मधे मिरवा ॥ आता हवेलीचा जमाव ॥ त्यांत शोभे जगदेवराव ॥ काय सांगूं त्याचे नांव ॥ क्षण एक बसा ॥२॥

ऐका मुत्सद्यांचा थाट ॥ मोठे मोठे जी आचाट ॥ नजिक सरदारांचा कोट ॥ हातीं ढाल पटा ॥ डावी समशेर कडक ॥ लाल पोषाख भडक ॥ झाला पाहुन सडक ॥ अंग्रेज धीट ॥ तिरतीं पाण्यामध्ये नांव काय सांगूं हाव - भाव । ऐका मुत्सद्यांचे नांव ॥ कटी जरीपटा ॥ केला पेटी आणि जाड नाही चहुं चहुं जोड ॥ केला लौकिकामध्ये जोड ॥ बैठकी ओटा ॥(चाल)॥ बसून हवा पाण्याची पहा ॥ शिवरावजी मुख्य महा जन म्हणती अहा अहा ॥ झाला कीर्तिचा पसर ॥ कांही नाही कसर ॥ सार्‍या शाहींत नेसर ॥ सांगू तरी कसा ॥३॥

आला मुत्सद्‍द्यांचा भार ॥ आता ऐका हो सरदार ॥ मुख्य श्रीमंतांचा प्यार ॥ बाबाजी गुजर ॥ शोभे समशेर आणि ढाल ॥ सदा रंगांत खुशाल ॥ शेला भरजरी दुशाल ॥ करी कवन हुजुर ॥ बावन पागा बारगीर त्यांत दादोबा गंभीर ॥ सार्‍या कामांत खंबीर ॥ चहूकडे नजर ॥ आता गुजर मोहिते जाण ॥ करी सर्वत्राचा मान ॥ त्याचे तर्क अनमान ॥ सदा गर्जे गजर ॥(चाल)॥ अहेरराव नाना पाहणें ॥ दानधर्म अनुदिन जाणे ॥ पाचपेच कांही न जाणे ॥ आता बागुल (बागल ?) पाटणकर । लौकिक घाडग्याचा फार ॥ केली भली हो तलवार ॥ सामने तसा ॥४॥

ऐसे शिवरावजी दिवाण ॥ आतां कृष्णराव जाण ॥ ज्यांचा लौकिकांत मान ॥ तो जोरासी हिरा ॥ सर्व मुत्सद्यांत सार ॥ दावितसे सारासार ॥ करी बसून विचार ॥ बोले मधुरगिरा ॥ भला लोकावरते रबाब ॥ भला जनांत रबाब आणि शिपाई जबाब ॥ बोला धिरा धिरा ॥ ऐसी झालीसे आवाई ॥ आतां फडणीस सवाई ॥ नाना चिटणीस पाही ॥ शाईमध्यें शिरा ॥(चाल)॥ कारखाने श्रीमंताचे ॥ वर्जिले हो ऐका साचे ॥ मुख्य मुख्य मधे लोभाचे ॥ आधीं नारायण काशी ॥ झाली माहिती सर्वत्राशीं ॥ स्वाधीन कलेक्टरी त्यासी ॥ दिसे धर्म जसा ॥५॥

मखमलीचे तकिये लोड ॥ पडदे किनखापाचे सोड ॥ लागे हवायाची झोड ॥ रोषणाई बरी ॥ बत्त्या मोमबत्या हो फार ॥ सुटे बारुदीचा मार ॥ केला लंकेचा सुमार ॥ असा परोपरी ॥ अंग्रेजासी बोलावून ॥ त्यासी रचना हे दावून ॥ क्षण एक पाहून ॥ मेजवानी करी ॥ ठायी ठायी तक्तपोश ॥ बैठका त्या गाव कोस ॥ झाला अंग्रेज संतोष ॥ म्हणे तर्‍हा बरी ॥(चाल)॥ असा झोक नाही नाही ॥ म्हणुन सर्व देती गाही ॥ कीर्ति ऐसी दुरवर पाही ॥ कांही वर्णावे ते जनांत ॥ जसा कुंजवनी कृष्णनाथ ॥ तैसे शोभे गोकुळांत ॥ अनभाव तसा ॥६॥

ऐका बंगल्याचा झोक ॥ ठायी ठायी तक्तपोस ॥ काय सांगू नोक झोक ॥ बैठका करून ॥ वाजे सारगी सतार ॥ लागे पखवाजाचा ताल ॥ भले गवई गाणार ॥ सुरताल धरून ॥ देतो छावूनीया रंग ॥ सारी सभा होय दंगा ॥ दिले बंगल्यावरते रंग ॥ कुल मिना भरून ॥ वरते शोभे काच पाच ॥ चित्र विचित्र तैसाच ॥ झाड झडुला सिराज ॥ ऐसा रंग करून ॥(चाल)॥ लाल बिलोरी आयने खुले ॥ सुवर्ण मोती वर डुले तर्‍हेतर्‍हेचे वर्ख खुले ॥ केले रंगाचेहि मोर ॥ तेहि पाहति समोर ॥ पाहताति थोरथोर । आलें काम सोडून ॥७॥

झाली भोसल्यांची कीर्ति ॥ किती वर्णावी, ते श्रुति ॥ नाही नाही ऐशी दृति ॥ धुंडियेलें त्रिभुवन ॥ कवि शिवनाथराव शिरि वंदुनिया पाय ॥ दृढ झाली कृपा सांगु काय ॥ केले राव कवन ॥ आतां कवि घरोघर ॥ नाही कोणी बोजदार ॥ करू पाहाताति जिकर ॥ नाहीं न्यून जरा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP