मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
तुझे गुणमी वर्णू किती छत्...

शाहूमहाराज यांचा मृत्यु - तुझे गुणमी वर्णू किती छत्...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


तुझे गुणमी वर्णू किती छत्रपति । छत्रपति शिव झाला ॥ जैसा चंद्रमा लपाला । अवघा धुंधुकार पडला ॥ ज्यानें धनमाल सोडिला । गेला अंती तो झाला । इंद्रागती केली भक्ती ॥ तो शतयुगीचा सती । कीर्त सांगती ॥१॥

चारी दिशा भुल झाली । अवघी नगरी आकांतली ॥ कैशी गत शाहूला झाली । खाण रत्नाची खचली ॥ दोर खुटला तो पछि होऊन गेला । ह्याल सोडिला ॥ तो काळ कैसा हातचे हातीं ॥२॥

जसा गाईला घेरिला व्याघ्र । तैशी गत झाली सकवार ॥ शाहूसारखा शंकर । गेला खरा परतुन न ये संसारा । टाकुनिया पसारा सर्व जाती ॥३॥

कईकाचे गेलें अत्र । रडती संसारा कारण ॥ धनी समर्थ नारायण । जग पाळिलें, नाही कोण्डा छळिलें ॥ रत्न हरपलें तें, नाव त्याचें राहिले सर्वां चित्तीं ॥४॥

काय वर्णू तयाचे गुण । जैसा खेळ खेळला कृष्ण ॥ तैसें रूप गेलें झाकून झाले गुप्त । ते जनीं सांगती कीर्त साधुसंत ॥ ते मानवले भगवंत बरवे रीती ॥५॥

काशीहूनि एक राज । त्रिलोक्यांत नाव गर्गे ( गर्ज ) ॥ शाहूसारखा महाराज । होईना ऐसा धन्य धन्य स्वामी जगदीशा ! नेला कैसा । तो काळे घातला फांसा मोहनमती ॥६॥

छत्रपती पुण्यपावन । रयत रक्षिली आबादान ॥ घरोघर केलें सोनं अपरंपार ॥ कौल त्याचा करार । शाहू थोर महाराज जपमेश्वर ॥ जन ध्याती ॥७॥

जैसें रामानें केलें राज । तैं पद पावले महाराज ॥ काय वर्णु तयाचें तेज । फिरंगु नाना बोले सहज ॥ करितो भक्ती । मन भाव धरूनि चित्तीं ॥ तूं माझा हो भूपति । मज सारथी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP