मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| सकी आद करवीर तकत थोरजागा... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पट्ट्णकुडी व कोल्हापुरची लढाई - सकी आद करवीर तकत थोरजागा... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहील - खेमू ओमू Translation - भाषांतर सकी आद करवीर तकत थोरजागा, शिवबा राजाचा । दक्षिणेमंदि धनी नांदतो त्रिभुवनीं डंका त्याचा ॥ बोले खेमूबाळ दया हाय करवीर काशीचा ॥पोवाडाशूरमर्दाची लढाई झाली चढाई गर्दी राजाची तलवार ॥ परशरामभाऊ मोडला पट्टाणकुडीवर ॥ध्रु०॥आपासाब भाऊचा पुत्र करून मसलत स्वारी करावी दखणेवर । सांपडला आळत्यावर लढाई झाली जोरावर ॥ करविरास घेऊन आले जबरदस्त केले भ्याला आपासाब सरदार । क्रिया घेऊन सोडून दिले धनी महाराज वग्र ॥ सांगलीस गेला सांगे बापाला असें झालें अळत्यावर । आलें इसिम भाऊला बांधला दाली राजावर ॥ श्रीमंत बाजीराव लिहून अनभाव धाडला भाऊसाहेबाला पत्र । घेऊन गेला दलभार उतरला जाऊन पुण्यावर ॥ रास्त्याला जमाने क्रिया केले फार । झाला मोकळा भाऊसाहेब आला भाईर ॥ इमान भाक देऊन स्वारी केला गडावर । नाना फडणीस लिहून अंतूस धाडला करविरास पत्र ॥ म्हराजाचें सैन बडविला दैन सांगलीवर ॥शूर०॥ ॥१॥आला सातारी महाराज घेऊन फौज, पाठी लागले दुरवर ॥ भाऊसाहेब उतरला करनाटकासमोर ॥ नाहीं पेशव्यास मानला, गैर बुद्ध केला ॥ उठविला चहूंकडे दलभार ॥ महाराजाचा मुलुख बडविला तुंगभद्रेपातूर । कांही आला सर करीत, ठाणे घालीत उतरला येवून चिकोडीवर ॥ उठले पेंढारी दखणचे वळूं लागले गुर ॥ श्रीमंत म्हाराज घेऊन फौज असे फिरे बातमीवर । ठांई ठांई नित लढाई होई आठोपार ॥ दोन लाख लष्कर भाऊसाहेबाचे दलभार । बुणुगबाजार लष्कर उतरे तीन कोसावर ॥ आरब लोक हबशी ऐका शिपाय सनदी न्यार । जरीपटक्याचा धनी अघाडी आपा कीं लिपाणकर ॥ नाहीं दरकार भाऊला भ्ररांत केला येऊन, घडलें होणार । मुहुर्त पाहून डेरे दिला पट्टणकुडीवर ॥शूर०॥ ॥२॥आले क्रोध महाराजाला तयारी केला स्वारी करावी भाऊवर ॥ मानकर्यासी पत्र धाडला जमले शार्दूळ वीर ॥ आले सत्तावीस गडकरी झाले तयारी पंत विशाळ बावडेकर । यादव जाधव भोंसले खाणवटकर ॥ आले नारोजीबा घोरपडे वाजे चौघडे सैनापति कापशीकर । चतुरशिंग राजा रन्तागिरी हिंमत बाहादूर ॥ आला राजबा तात्या खर लिंबाळकर । सरनोपत दादा सरदार ॥ गोविंदराव कोकर्या चिटणीस फडणीस फलटणकर । आले दौलतराव इश्वासराव दिनकरराव चवाण हैबतराव वग्र ॥ शामजी घाटगा मानसिंग बावा पाटणकर । आला आबासाहेब बागल खानवटकर ॥ भले रेखोजी बाणाईक हुजर । बाबुराव भोंसले सुभानबा बोडक्या दिलदार ॥ भलेभले सरदार खासबारदार शिपाय बाहादूर रणनवरे । धुडगांवकर नलवडे शेंडूरकर मामा वग्र ॥ जनबा काका भला जाहीर सैनेला, रघुनाथ मान्या हंबीर । मानोजी भाऊ जगदाळे बेडकीहाळकर बाबा रणवीर ॥ इटया पटयाचे झोंक कानडे लोक, बाळासाहेब, तोरगलकर । रणबाजा राऊत कडाकी नागवी हत्यार ॥ आपासाहेब घाडगे तयाची कमान जोरावर ॥ पांचशे फौज सवाशे पेंढार अग्रीसार ॥ आंडगर बंडगर झेंडया धनगर सहदेव सरदार । पांढर्या कैदम लोकांडया आणखी सपकर ॥ बापूसाहेब सर्जेराव गरजतें नांव दलामधिं त्याची तलवार । जरीपटक्याचा धनी सवाई खंबीर कागलकर ॥शूर०॥ ॥३॥असे बाराशें उमराव जमले राव निघाले बांधून कंबार । चालले दलबार जसे काय राम लंकेवर ॥ दिसे फौजेचे भार देव अवतार उतारले हमद्या वाडयावर । दिसे पांढरें फेक चौहूंकडे भाऊचें लष्कर ॥ करूं लागले मसलत बसून डेर्यांत मिळून महाराज मानकरी सार । नव्हती भाऊची बळीख धराय करीत मजकूर ॥ धनी महाराज बोलले विडे मांडले ठेवले पैजेनें म्होरा कोण धरील भाऊला भदरगड किल्ला देईन खर । सजेंराव बापूसाहेब विडा उचलला पर ॥ तिनदा गेला सपा घालाया भाऊसाहेबावर । फिरले माघारी फौजा कोण पाय घेईना म्होर ॥ आला राजाला क्रोध महाराज बोले हिनवून फार । कळली तुमची किंमत लढाईची हिंमत, खावून बुडविला जागीर ॥ घ्या हातामधि कांकण घालून चला जाऊं माघार ॥शूर०॥ ॥४॥एवढें ऐकूनशिनया गले क्रोध चढले केले मंगळवार मजकूर । झाले नगारा तयार तोफा भाऊसाहेबावर ॥ जसे अग्रीचे कोट चालले थट धरून दोही बाजूनें फर । आले चढाई करून तंवदी डोंगर समोर ॥ भुल पडली भाऊसाहेबाला हुकूम नाहीं झाला बिनआधारी लष्कर । सोकटयाच्या खेळामंदी गुंतला वग्र ॥ असे राजाचे उमराव घातले घाव, रगडले अवचित डेर्यावर । तेव्हां भाऊला उमज पडला गडबडलें लष्कर ॥ मग स्वार झाला भाऊसाहेब चडला घोडयावर । श्यामजी घाटगे बापूसाहेब कागलकर ॥ केली दोघांनीं लगट जाऊन धरले घोडयावर । राजापाशीं घेऊन आले डेर्यासुमार ॥ धनी महाराज बोलला “नको दृष्टीला जीव मारा नेहून दूर” । दवलतराव विश्वासराव तोडून केले चूर ॥शूर०॥ ॥५॥असे लढाई झाली पर खवळले ईर । झमाझमा झमकली तरवार ॥ बकर्यावाणी मुडदे पडले भले भले सरदार । झाला पांढर्या ठार छाती मंदि पार मरला भाला निपाणकर ॥ जरीपटक्यासहित उडला नाहीं गावला बहादूर । नाहीं समयाला कोणी पळाला धनी आपासाब भाऊचा पुत्र ॥ नाहीं कवणाचे खबर कवणाला, झाले गळाठा सार । दोन लाख भाऊचा दल हात जोडले गाई परमान चारा धर ॥ शिपाई खासे राहिले निस टाकून हत्यार । सांपडला भाऊचा खजिना लुटाव केले सार । हुट सांबार कोणी पुसेना झालें दळिंदर दूर । निघालें महाराज खुशाली झाले मानकरी सार ॥ उतरले जाऊन ठिकाणा हामद्यावाडयावर । त्याचा मान त्याला राजानें दिला, केला बापूसाहेब प्यार ॥ गडाबद्दल पांच गांव दिलें वाळवें खर ॥शूर०॥६॥आला यशवंत महाराज घेऊन फौज डंका वाजे बिन्नी ह्योर । अंबाबाईला दर्शन केलें यशासूर करविर ॥ भल्यानें जाऊं नये तक्तावरी दखणचे शिरीं शिवशक्तीचें आदघर । मीपण करून भाऊ बुडाला नाहीं चढला हत्यार ॥ त्याच्या मागनें क्षेतर भाऊचा पुतुर आपासाहेब केला राजाला । तीन महिने वेढा घातला कंपूचें लष्कर ॥ नाहीं मुंगीला रिघाव तोफा भोंवत्या भोर -। जसे मेघाची फळी, मांडली गर्दी दखणेवर ॥ धनी महाराज पार झाले पन्हाळ गडावर । बुणगे बाजार लढूं लागले बंदुकीबारदार ॥ आपासाहेब भला पैज बोलला आतां घेतों कोलापूर । पंचगंगेला माती मिळवितों दांत खाई करकर ॥शूर०॥ ॥७॥गड उतरून आले खाल, घेतले चाल रगडलें घोडीं कंपूवर । दौलतराव विश्वासराव रणभैरी भादूर ॥ पाठी लागली फौज, मारली झुज गर्दी झाली दोघांवर । लागल्या जखमा दौलतराव झाला जेर ॥ काय शिरलें दलामधिं वाघ, हातामधिं सांग, विश्वासराव रणनवर । पडली फौजेची मिठी तयाला जित धरले हो पर ॥ सांग आमुच्या भाऊला कोण तोडला पुसे आपासाहेब सरदार । बोले विश्वासराव आम्ही मारलों तलवार ॥ कापले राव गळा विश्वासराव झाला ठार । महाराजाला वर्दी लागली पन्हाळगडावर ॥ खबर ऐकतां प्राण सोडला दौलतराव थोर । धनी महाराज दुक्षी झाले काय वदले हंबीर ॥ आला हैबतराव धांवून पालकीतनें मुडदे न्हेला गडावर । सायासानें आगीन दिले माहाराज मानकरी सार ॥शूर०॥ ॥८॥कोलापूर जायाचे मजकुर आले चढाई केले वेढले कंपूचें लष्कर । नाहीं कवणाचे कटाव दखनेला पडले अगोचर ॥ जरीपटके गादीचे धनी सर्जेराव गुणी तयांनीं केला मनसोबा खर । हिंदुस्थानामधिं पावणे शिंदे होळकर खंबीर ॥ दिला राजानें तोडा सातशे घोडा गेला बापूसाहेब वग्र । दो दिसांमधिं आलें कंपूला शिंद्याचें पत्र ॥ आपासाब वाचुनी पाहिला. मनामधिं भ्याला दिसालें धरायचें मजकूर । रातोरात पळून गेला सोडून कोलापूर ॥ करविरामधिं धनी महाराज आले सत्वर । हिरा लावले तुरा अवघे मानकरी सार ॥ येस घेऊन आला बापूसाहेब कागलकर । होती गैबीची दया विघ्न कांपती थरथर ॥ बेडकीहाळ किल्ला आखाडा भला शिवबा राजाचें जहागीर । खेमू ओमू केला पवाडा बाळक हाई नेणार ॥शुरमर्दाची०॥ ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP