मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| करविर किल्ला बहु रंगेला प... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - सुलतान पाटील Translation - भाषांतर करविर किल्ला बहु रंगेला पंचगंगेच्या हाय तीरीं । महा तीर्थांची महिमा सांगतो गाजति तीर्थ भारी ॥गणपतीचें स्मरण करितां परसन हो दत्तात्तरी । काशीविश्वेश्वरनाथ बसले ते रथावरी ॥ अंबाबाई नांदे सवाई त्रिशूळ घेऊन करी । दैत्यावर करते फेरी ॥ बाबुजमाला किल्लांत झुले रंकनाथ आणि भयरी । आई कळंब्याची लक्षुमी आणि कंत्यानी धांवा करी ॥ फिरंगाबाय आणि महांकाली दोघी बसल्या शेजारी । आईतवारांत यमाबाय तिथें मग नांदे एकवीरी ॥ टेंबलाबाय आणि घुंतनी धाव धावण्या धारकरी । सावेजणी बहिणी मिळूनी शिंद्याचे कोटकरी ॥ गलीमाचा गोळा चालला जातो यो वरच्यावरी । निशाण पांढरें बुरजावरी ॥ गैबीचा मारा भारी । मंगळवारामधिं । लिजामअल्ली घोडपिराची खडी स्वारी ॥करविर०॥ ॥१॥रावणेश्वर तीर्थ थोर किल्ला आहे पाण्यावरी । काय सांगूं हवागिरी ॥ रंकाळें आणि पद्माळें दोनी तळीं तीं बरोबरी । शिधाळें पेटाळें टाकाळें नागराळें राहिलें दुरी ॥ कोटतीर्थावर गलीम आला उभी राहिली येवून स्वारी । जितीस जाया रिघाव नाहीं आलों बा म्हणती पेंढारी ॥ वरुण तीर्थाचें पाणी पितांना कंटाळा हो आला भारी । संध्या मठापाठीं आंगोळ करून जाऊन बसले क्षणभरी ॥ मग बसव्याचें दर्शन घेतां जातो तो पाण्यावरी । रंकाळ्याचें पाणी पितांना कंटाळा आला हो भारी ॥करविर०॥ ॥२॥अवघीं तीर्थें करूनशानें मग आलों केसापुरी । उजवी घालून हो नगरी खंडेराव हैबती बसले तेबि नांदे तळघरीं । विठोबा बुरुजावरी ॥ थळवेताळ आणि पांढर घर आंगीचें भवसरी । गरीबाचीं माणसें भारी ॥ जिकडे हल्ला तिकडे टोला दारें हैत चौफेरी । क्षण एक नाहीं उशीरी ॥ घोडे राउत एकदां निघाले दोनी करिती बरोबरी ॥ पाहून हो कांपे वैरी ॥ लष्करामधिं धाक पडला शाई झाली घाबरी । पुण्यास हो गेल्या खबरी ॥करविर०॥ ॥३॥एक वर्सानें आंगोळ करावी तिथली महिमा हाय भारी । उत्तरेश्वराचे दर्शन घेतां जाऊन पाहिली मछिद्री ॥ चिटकोबाची खडी पायरी बसला तो माळावरी । शिंगणापुरी हटकीश्वरी तो बा नांदे जळचरीं । पार्यावडापाशीं संगम निघाला महिमा आहे भारी । एक वर्सानें आंगोळ करावी तिथली महिमा हाय भारी ॥ वरिंग्यांत ईश्वरनाथ बसले ते नंदीवरी । आई पार्वती महाशक्ती किल्ल्याची चिंता करी ॥ वीर हणमंत दोई तोंडया तो रघुवीरी । कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ॥ महा करी ॥ वीर हणमंत दोई तोंडया तो रघुवीरी । कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ॥ महा तीर्थाची महिमा सांगतो गाजति तीर्थ भारी ॥करविर०॥ ॥४॥धनी केदार दखनेवर तेनी लाविली नदर । करतो किल्ल्याची फिकीर ॥ तिरीथ अंगारा हमेश येतो धाडिलेही चौघे स्वार । एक इळाची येरझार ॥ दाणोखिंडीचा आला म्हसोबा अष्टकोट देव सार । ठाईंठाईं चवक्या पार ॥ छपन्न कोटी चवडाबाई तेलंग आणि मोहूर । हालावले हो मुळघर ॥ ते कृपाळ क्षेत्रीपाळ होऊनशान तयार । काळभैरी सार्या म्होर ॥ बाजे डंका सवाई ठोका गस्त हिंडे चौफेरी । अंबाबाईंची सरदारी ॥करविर०॥ ॥५॥तवां कंपूनें कटाव केला मोरचे आले म्होरे म्होरे । बनपुरीपाशीं डेरे ॥ शुक्रवारामधिं येऊन शिरले पेठ धरली शनवार । तोफा वोढिल्या बाहेर ॥ फत्या बुरजाला मार लाविला ढांसळती त्याचे चिर । भिताड केलें बरोबर ॥ बारा तास बत्तीस घडया खिणी एक नाहीं उशीर । होतो गोळ्याचा भडिमार ॥ तवां आपाला म्हाराजाची ताकीद येती वरवर । असावें खबरदार ॥ खुब जुर्नीने किल्ला राखावा हें पूर्वेंचे आदधर । पन्हाळ्याचा आघार ॥ दारूगोळीला गणता नाहीं कुमक येती वरवर । लोक भोंवतेनें चौफेर ॥करविर०॥ ॥६॥शुक्रवारमधिं तोफा लाविल्या नेहून हो चावडी म्होर । झाला धुराचा भंकार ॥ डोईवरनें बाण चालेना तेव्हां दिसेना काय म्होर । लोक म्हणती तटावयानें आतली गोळी क्षिणभर ॥ राहिला किल्ला झाला थंडगार । आडा हो जमले सार ॥ रत्नाकर आपा होते गंगेच्या वेशी म्होर । नामी नामी सरदार ॥ काय बघतां दादानों विघ्नें आलीं व्हा म्होर । चाल द्यावी सैनेवर । राजमंडळीचें माणूस सारें पूर्वीचें वतनदार । वेशीला बांधून हो शीर ॥करविर०॥ ॥७॥शिंपण्या दिवशी हल्ला नेमिली कंपु झाले तयार । हालावलें हो सैन सार ॥ तवां भाऊचा लेक म्हणतो पेंढार्यासी व्हार म्होर । भोंवतेनें वेढा शाहार । कुरुंदवाडकर दादासाहेब चिंतामणराव मिरजकर । तेनी धरला सवता घोर ॥ दोन शिडया हो म्होरे आल्या निशाण हो त्येचावर । संगे कंपूचा सरदार ॥ दोही तोंडानें हल्ला चालली बाजा वाजति व्हलेर । आले खंडकाच्या शेजार ॥करविर०॥ ॥८॥शिडीवर लोक आले कुणी नाहीं गेले माघार । ते पडले खंदकावर ॥ साडेचारशें माणूस ठार झालें हो जाग्यावरी । अशी लष्करांत हो खबरी ॥ तवां भाऊचा लेक म्हणतो बुडालें देवा घर । फौजेचा तुटला घर ॥ निपाणकर आपा पुढलें सांगित होता होणार । हल्ला नका करूं किल्ल्यावर ॥ रेवणकर बाजीबा चालून गेला बुरुजावर । तोफ वोढिली त्यानें म्होर ॥ तोफेचे तोंडी दिली रजेगिरी म्हणे पेटव लौकर ॥ मारले कंपू फार फिरली हल्ला धर तुटला पळूं लागली माघारी । कैग टांगडया वर करी ॥करविर०॥ ॥९॥महाराजाचे लोक नेमाचे शिपाय हो सरदार । येक उठला महावीर ॥ खंडेराव भोंसले शिपाई हो सरदार मानोळकर । किल्ल्यांत हो सावध फार ॥ विजापूर वेशीला मुंजापादाजी हिंमतबहादूर । निघाली हो त्याची समशेर ॥ खानवीलकर दादा, त्याच्या संगें तोरगलकर । निवडली सवती धार ॥ बेडकीहाळकर बाबा, होऊन आले तयार । बाजा वाजती व्हलेर ॥करविर०॥ ॥१०॥तवां आपानें ताकीद केली शहरांमधिं घरोघर । होऊन यावें तयार ॥ साकोळीला सुरंग लागग्ला कोणी वेळेचा त्यो थर । आंत ओढलें तळें सार ॥ ढोरेंगुरें पाणी प्यालीं अवघीं सारीं जनावरं । नगरी झाली थंडगार ॥ दाणापाणी खावुनशानें सावध झाली हो नगरी । वैर्यावर ठोका मारी ॥करविर०॥ ॥११॥मनकर्णिचा चिखल काढुनि उपसावी बेगी हीर । पाणी करावें तयार ॥ बाबूजमाल झर्यांत गेलों तिथें दादा दाटण फार । धड जाईना घागर ॥ गोखल्यानें तळें फोडिलें नांव केलें केवढें थोर । गडबडले तेव्हां शाहार ॥ कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागे खारी । खावेना डाळभाकरी ॥करविर०॥ ॥१२॥पन्हाळ्याचे लोक फांकडे दखनपाणी हाय खर । माणूस हो मारील फार ॥ कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागे खारी । खाईना डाळभाकरी ॥ बारा रुपयाला बकरें झालें एक एक करते हुरहुरी । मालवणगडचे लोक सारी ॥करविर०॥ ॥१३॥केदाराची दया पुरती रत्नाकर आपावर । आला सपनामधिं लौकर ॥ काहो निजला तुम्ही भ्रमांत सावध व्हावें लौकर । हाडबडून जागा झाला कुठे दिसेना काय म्होर ॥ तसच उठला लौकर । गोखल्यांनीं हल्ला चढविली आली म्हणती खंडकावर । उन्हाचा पहिला भार । पेढेंखान सावध होता म्हंकाळ्या बुरुजावर ॥ म्हणे देवा झालें बर । केली कीर्त न कळे अंत धन धन देवा मुरारी ॥ तारिलेंस लाखादारी ॥करविर०॥ ॥१४॥एक बटीक काव करोनी जात होती धुणें घेउनी । न कळे देवाची करणी ॥ चौकीवाल्यांनी तिला अडविली मधिंच झाले धनी ॥ पुढें जाऊं देईना कोणी ॥ हिकडे आण ग आंमधि आहे तें काय बघुं दे गांड मनीं । मग बोलिले दबावुनी ॥ उघडून पाहतां आंत कागद झाल्याली हो करणी । वाचून हो पाहातो धनी ॥ ह्या रांडेचें नाक कापा द्या मुलखावर सोडुनी । सांग होते ग कोण कोणी ॥ फितवापांजरा कांही चालेना गलिम हो चिंता करी । येऊन पडला विचारी ॥ म्हणे सुलताना साहेब चरणा विनती करतों वरवरी । दया असावी मजवरी ॥ कर जोडुनी करतों विनंती मस्तक हो चरणावरी । हात ठेवावा तुम्हीं शिरीं ॥करविर०॥ ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP