मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| भले नाना फडणीस केली कीर्त... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा नाना फडणीसांचा पोवाडा - भले नाना फडणीस केली कीर्त... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी नाना फडणीसांचा पोवाडा Translation - भाषांतर भले नाना फडणीस केली कीर्त सवाई । चव मुलखी धास्त त्रीलोक जानती शाही ॥धृ॥ संपन्न सर्वगुनी ब्रहस्पति - प्रमान । कोमळ हदई जैसे भोळे सीव जाने । पाहाता थोरपन मेरू दीस्तो लहान । आर्जुन कर्न त्या तुले पराक्रम जान ॥ चेतुरता पाहाता विशेस गुन सुज्ञान । कुठवर कीर्त वरनावी तर्ही मुखान । आदभुत ज्ञान उपमा किती मुन द्यावी । प्रीथ्वीचे वजेन किती म्हुन कोनी जोखावी । कीती खोल सप्त पाताळे मुन सांगावी । संभुच्या तपाची गनना कैसी करावी । आद सेक्तीचा जप किती म्हुन की वदावी । कीती वर्णू पराक्रम म्हुxस्तुत बोलावी । नाना फडनीसच प्रमान तुमची पदवी । सत्त्वधीर कीर्त हारीचेद्रातुले जाली ठावी । श्रीयाळ त्याहुनीया महिमा आघवी । आंतरी शांत कोमळ कठुरपन नाही । येसस्वी सदा कल्पना सर्वा ठावी ॥१॥नारायन आवतार संपले पाहा जैपासुन । तैपासून सांगतो व्रत ते घ्या आयेकुन । गरभी असता श्रीमंत शेर्त (शत्रू) मर्दी (र्दू) न । चालविल राज नानानी हीमत धरून । कैवरी छेत्रू ठेविले आपनाधन करून । तीळतुले कोठे पडु दिल्हे नाही नुन । धर्येवत नव खंडांत गाजती क्रीत । नादती रहीत (राहात) खुसवतु सहेर पुर्यांत । बसल्याच ठाई प्रताप करून आदभुत । मोंगल हापासी फिरगी हेदर्यासहित । खडन्या देती ठेविले आनुन जर्बत । बसल्येच ठाई बाछाव आले चालत । केला मुलुख काबीज सागरवलयाकित । येकछेत्री राज भगवा केली झेडा सेर्त । कुठवर वरनावी महिमा विष्णु - भगत । श्रीमत् रावसाहेबाची फिरवीली द्वाही ॥ छेपन देशामध्ये म्हासुर पडली आ (वा) ई ॥२॥श्रीमंत लाहानाचे थोर केले नानानी । सेवेसी सादर उभे कर जोडोनी । सद्धावे लक्ष लावुनी धान्याचे चेरनी । येकनीष्टये सेवा केली चितापासुनी । धरयेला नाही द्वैतभाव आंतकर्नी । चालविले राज पाहा नाव धन्याच करूनी । चोविस वर्षे नानांनी कारभार केला । नंतर माधव आवतार निजधामा गेला । कसे रा (ज) पुढे चालेल मुन विचार पडला । अनावे सवाई बाजीराव बे (त) ठरवीला । तव घडी रवाना केले परसरामभावुला । भंडारक्रीया भावुन दिल्ही श्रीमंताला । पुन्याशी आनीले बाजीरावसाहेबाला । खडुखडुचे मुकामी नाना गेले भेटीला । कूच दरकूच करून माघुन सिंदा आला । मसलद केली नानानी मग ते समई । आज्ञा घेऊन सातार्या गेले लावलाही ॥३॥नाना कावा करून गेले महाडाला । बरे पाहु कोन चालवील या राज्याला । नानाचे मागे व्रतांत कैसा जाला । सांगेतो स्वत चेतुर आना ध्यानाला । बाळोबा पागनीस भावुसंग मिळाला ॥ मसलत करून राजाचा फितवा केला । जरीपटका मागु लागले बाबा फडक्यासी । परचुर्यापसुन घेतली हीरुन मकलसी । नानाचे लोक होत लचे ? तस्ती केली त्यासी । जुने कारभारी होते केले दुर सार्या (सी) स्व आगे करू लागले भावु चवकसी । पुढे आसता आवलंबीले थोर कार्यासी । याचे न व दा न व जाचे सेवटासी । व्याघ्राची सर काये येती जंबुकासी । पंडीताची सर काये न ये मुरखासी । न कळे मुढासी पुढे होईल कैसा आपलेच ठकानी बसले होवून बाछआई ॥४॥सीद्याचे भेटीला बाजीराव धनी गेले । मग मागे बाराभाईनी कैसे केले । बाबाकडे जाऊ म्हून आपासी सांगितले । घालून पालखीत तंद घडी पुन्यासी आणले । पाहा करू नये ते विप्रीत कर्म केलें । दील्ही वस्त्रें जबरदस्तीने तख्ती बसविले । घरोघर करू लागले कारभारासी ॥ चवगदी बैसवील्या चौक्या सेहेर पुन्यासी ॥ ठेवीले कारकोन ठाई नाक्यासी ॥ झाडा घेती बाहीरुनसे हेऊन आल्यागेल्यासी ॥ फोडुन पाहाती कुलतमाम लाखोटयासी । हे आल्पबुधीन आखेर पडतील काx॥ कसी होईल बरोबरी रवीची खद्योताची । मोराची प्रीतिमा नये लाढोरासी ॥ च्यार दीवस मौजा केल्या होवुन सुक नासी ॥ कुल कारभारी भावुचे ठाईठाई । पुन्यात कारभार करती बाराभाई ॥५॥पागनीस परसरामभावु सीद्यासहीत । कुल तमाम पाहा नानावर फिरले होत । अच्याट बुध नानाची न कळे आत । कळस्रूत्री कावा केला बसुन माहाडात । सीद्याला पत्र पाठवीले लेहुन गुप्त । का परबुधीन घालीता कलप स्नेह्यात ॥ पुर्वीचे वचन चितात करावे स्मरन । तुमचा आमचा येकलास पहील्यापसुन । मातले फीतोनी यासी बंधन ॥ समजले दवलतराव पत्र आसे पाहुन । तदघडी बाळोबा पागनीसाला धरुन । ठेवले आटकत त्याहासी जप्ती करून । तैसच आर्षेन धोंडीबाला करून । बाजीबा मोधी पुत्रासहीत जान । वगैरे साते आसाम्या थोर लाहान । पुन्यातील धरले किती ईचे सीवाई । सागतो नावनीसीच ऐकून घ्या सर्वही ॥६॥प्रथम वासुदेव कोतवाल केला जप्त । त्यामागे यकासरसे येकाला धरीत । प (ब) हीरो रघुनाथ धरीला ऐका त्वरित । रमी कोडी दोघी कळवावातीनी सहीत । आन्याबा मेदळे नीमये चीतोपंत । सीवपंत मोडके राघोपंत थत्ते । जयराम जोसी जुगी राखी सहीत धरला । केसो शामजी भान्या चेतुरभुज केला । आनीक बाळाजी वीष्णु सहश्रबुद्धयाला । त्याची राख लक्ष्मी ठेविली कैयदला ॥ माहादाजी काळे विठ्ठलराव गोळ्याला । रामचेद्र पराजपे भिकाजीपंत आटकवला । मग धरला चीतो मोरेश्वर सीवनेरवाला । बाजी मोरेस्वर देवरुख्या पळून गेला । गणपतराव करमरकर आना ध्यानाला । सदाशिव थत्ते सदाशिवपंत जोशी वहीला । पानशा तोफखान्याचा धरून ते समई । जनोबा सुभेदार दस्त केला लवलाही ॥७॥श्रीपतराव पटवर्धन आल्मखान । सटवाजी लाड येसाजी घाडगे पुर्न । वाडयातील चार नाईक घ्या ऐकुन । हरी विष्णु सहश्रबुधे पाहा निरखून । वीसाजीपंत वाडदेकराला धरून । आबाजी बलाळ सहश्रबुधे जान । हारबाजी धायगुडे हीरोजी पाटणकर मोरो बापु बाबाजी? आभ्याआकर । अन्याबा आभ्याकर आनीक दोन हुजरे । निसबत फडक्याची दोन खीस (म) तगार । धरील्या आसाम्या बावन यकतर । आनीक लहान थोराचा नाही सुमार । जे ना (ना) कडे गेले ते ऐका सरदार । मानाजी फाकडे मल्हारराव पोवार । नीलकंठराव दीनकरपंत भडभडे चेतुर । बळवंतराव गोडबोले समजुन ह्रदई । गोपाळराव राजपागे असाम्या साही ॥८॥राहिला थोडा मजकूर कथा मागली ।.... N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP