मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
चाल - “ लक्षुमि गर्वे निं...

बाजी पासलकर - चाल - “ लक्षुमि गर्वे निं...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


चाल - “ लक्षुमि गर्वे निंदा बोलुनी झिडकारिती पार्वती ”- प्रभाकर.

पहिलें नमन माझें देवा नारायणाशीं । दुसरें नमन माझें सद्‍रुच्या चरणाशीं ॥ जाऊलीच्या मैदानी बैसले शिपाई मगलशीं । मिळून बारा मराठे कधीं न येती जाऊलीशीं ॥ “ येथून जोहार पाठवा मोर्‍या चंद्ररावाला । बादशाहा देईल आज्ञा तरी मी जाईन कुरडुंला ॥ लाटिन त्या बाजीची घोडी भेटवीन तुम्हाला ” । पैजेचा विडा सोनू दळव्यानें घेतला ॥१॥

कुरडुंच्या मैदानीं नांदे बाजी पासलकर । आठगांवचा देसाई त्या बाजीचा धाक थोर ॥ दंडाएवढी मिशी बाजी पाच्छाई महाजर । आनंत्या जेवितो ॥ आलिया मर्दाचे फटकारे संभाळितो । सांगेन मर्दाची ख्यात बंदा बाजीचा म्हणवितो ॥२॥

पांचशें पायदळ खासा सोनू दळवी चालला । दळव्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ॥ हांटल्या कळकी जाळ्या, दळवी जाळ्यांत लपला । चांगयान धोब्यानें रूप अस्त्रीचें घेतलें ॥ कानीं नाहीं बाळ्या ( म्हणून ) वरून सारफळ्या ल्याला । कपाळीं नाहीं कुंकू
ज्यानें विटकर उगाळिला ॥ नयनीं नाहीं काळज ज्यानें काजळ घातला । घागर चुंभळ घेऊन कुरडूंच्या पाणवठयावर गेला ॥३॥

रावराणूजी रावकृष्णाजी गेले पारणें सोडायाला । आमचा येल्या मांग बायकोला मूळ गेला ॥ खंडयायान महार शिंदी पिऊनि पडला । आमचा बाजीबोवा नेटका जेवाया बैसला ॥ बाजीच्या पंक्तीला चवदा रजपुत जेविती । उठल्या अंबाई धाकली बिंबाई वाढतीत । एका आगळे बंदी शंभर मंदिरात वागती । चांगयान धोब्यानें पाळत घेतली पुरती ॥४॥

मकरतराव जांवाई ज्याच्या वाडयांत शिरला । बुरजीं होत्या टेहळ्या धाडधाडसा बोलला ॥ उठल्या अंबाई उंच दरवाजा लाविला । धांवली बिंबाई परस दरवाजा लाविला ॥ पांचशे दळव्याचा ज्याचा एकच रगडा झाला । अंबाईनें बिंबाईनें ज्यानिं उरावर हांटिलें ॥ ” ह्याच जांवायाने आमचे घर ग बुडविलें । यासुद्धां तिनदां येउनि घरावर घातले ”॥ बिंबाई बोलली “ रावराणूजी नाहीं घरीं । आमचा येल्या मांग शंकर अंतरला दूरी ॥ असता खंडया महार (तर) फोडता दळव्याची कोटगिरी । त्याच्या बायकोला देत्यें गळ्यांतील बिलगिरी ”॥५॥

रोही रानांत चरले आज बाजीच्या आखरा आले । फरक देखिली जागा, वाडयांत शिरले ॥ ‘मारीन मुसळा घाय’ आनंत्या शिंपी याचा बोल । बाहेर मकरतराव दळवी गदगदां हांसले ॥ मकरतराव बोलला ’ अरे तू शिंपीयाच्या पोरा । तीन पायल्या हरबर्‍यास रे घेतला खराखुरा’ ॥ आनंत्या बोलला ‘आज मुंढयाच्या चिंध्या होती । तीन पायल्या हरबरे बाजीबोवाच्या कामा येती ”॥६॥

कास कासली, वरून ज्यानें कंबरबस्ता केली । आनंत्या खुर्चुला याची धुम रे द्वारा गेली ॥ रागयानें क्रोधें किल्ली कवाडा मोडिली । उंच द्वाराचे दळवी ज्यानें परसद्वारा नेले ॥ चवदा यानें मुडदे ज्यानें वाडयामध्ये केले पांचशे सोन दळवी वाडयाबाहेर घातले ॥७॥

त्यानें म्हणून घोडा दटाविला बाजीच्या अंगावर घातला । आणिक फिरून ’संभाळ मामा’ बाजीबोवाला बोलला ॥.......। सराइत होता बाजी ज्याचा मारा संभाळिला ॥ मेणासुद्धां फटकारा दिला. जांवई धरणीला पाडला । होती अजगर ढाल जांवई ढालेने दाबिला ॥८॥

येल्याची म्हातारी येल्याशीं सांगू गेली । “काय बसलास येल्या तुझी कुरडू मारून नेली ” ॥ आनंत्या बोलला “ हां ग आला माझा भाई । काय पाहतोस दादा हाणतो घोडयाच्या रे पायीं ॥ मप नाहीं हत्यार मुसळाचा घाव लागला ”॥ त्यानें मग घोडा दटाविला येल्याच्या अंगावर घातला ॥ सराईत होता येल्या, ज्याचा मारा संभाळिला । मागल्यान हस्तकें ज्याचें शीर उडविलें ॥ रुमालांत घालून बाजीला दावायासी नेलें । काय आज्ञा यमाजीला गुरुची कृपा आहे. त्याला ॥ बाजीयान बोवाचा ज्यानें पवाडा रचिला । सव्वाशेराचा लंगर ज्याने हातामधीं घातला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP