मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा दत्ताजी जाधवाचा पोवाडा - १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी राजवाडे प्रत Translation - भाषांतर १माझे मन नमन मंगलमूर्ति म्या नामिली सारसती ।इनवी कर जोडुनी भवानी हुर्द द्यावी मती ।रणामधि रणसुर म्हणविती प्रांत जिंत्या करिती ।मरणाखर उद्राखर संसराच्या गती ।झाल्या बादशाही हुकमती वजिर बिजापुरास जाती ।झगडला दत्ताजी, मर्दा, थोर केली ख्याती ।ख्याद मी गाईनरे जाधवरायाची करणी ।(चाल)झगडला न्याहाळिवला त्या निलंगे मैदानीं ।तमाम उमरावाच्या भाल्याच्या शिंपणीं ।यशवंतरायानें, मारिली पहिली बिनी ॥२सरलष्कर दल्लेलखान वजिर होते कोण कोण ।दाऊदखान उल्लेलखान शेख फरासी कुत्तमखान ।तर लिहिले जोरावर पठाण संगत लोदी मुशाफरखान ।चालले वजिर यावर बिनी दल्लेलखान ॥३आयका दख्खनचे वजिर राव रंभाजी निंबाळकर ।भोसल्या बोवाजी संगत जाधवराव वजिर ।जाधवराव जगजीवन, माणकु बर्हाळ ब्राम्हण ।चालले वजिर यावर बिनी दल्लेलखान ॥( घोडा ८०००० दिल्लीहून निघाला )४पुणंधरीं झगडा झाला थोर झगडतां मावळला दिनकर ।झाली आसे रात्र फिरले उमरावाचे भार ।उमराव आले बहु दुरूनी बिद्दलशाही केली ससनी ।पाठविले वजिरराव शिरपाव देऊनी ।भांडतां गड जाला आसे जार, गडकर्यांनी केला विचार ।शिवाजी महाराजाला हो त्यांनी पाठविली खबरा ।हेजीब गेलासे हुजूर । सांगरे गडाची खबर ।गड चढतील मोंगुला ।माणुस जाया होईल फार । यावर शिवाजीच बोलला (चाल)म्यां मोंगलाशी दावा केला ।मारिले सुराईत शास्त्रखाना केली हल्ला ।मागून दसवंसिंग आला ।गड तो कोंडाणा भांडला ।शिवाजी बोलला आता भेटूं रजपूताला ( गड स्वाधीन केला )।५आवघा कटबंध करून ।मोगुल चालला तिथूनी ।चालति बिन्नीयेनी मोंगला पंढरपूरा गेले ।घेतले मंगळवेढे, खासे नाही सांपडले (आहो)।निलंगे मैदानी मोंगली रखत डेरे दिले ॥६सर लष्कर सर्जाखान ।वजिर होते कोन कोन ।हिंदुळराव, केदारफणी, घाडगे झुंझारराव चालले ( तर ते )।पांढरे नाईकजी कुळवंत्राचा मेळा झाला ।बलुलखान पठाण बहार तो कडाक्याने चालला ( तर तो )।पंधरा हजार घोडा सर्जाखान जोर आला ॥७सर्जाखानी दवडा दिला ।हुलरे पडली कुल कटकाला ( आरे )।मारले कबाडे वाणी बहुत नागविला ।सर्जाखानी दवडा दिला ।सातशे वंजारा लुटला ।कापलासे गोट सर्जाखान निघून गेला ॥८दत्ताजी बाहीरच निघाला सूर्य सुभान प्रकाशला ।भारामधीं धूर रे रक्षण दत्ताजीला ठीक मग दावितो तेजिला । मार तो भरीतो बर्शिला ।शिकारीचा छंद विशारत देतो लष्कराला ( तर तो ) ।खेळलासे शिकार जाऊन आमराईंत उतरला ।पंधरा हजार घोडा सर्जाखान जोर आला ॥९( बडे मछिमे झाट झिंगा )सर्जाखानी भालदार आला काय बोले दत्ताजीला ।राव मग झगडता पूरवला निघून जावे या वेळेला ।यावर शिवाजीच बोलला देश दुनया जाणे मला ।झगडेन मी सत्येशीं नायकूं न टळे आपल्या बोला ॥१०सर्जाखानीं भालदार आला (नि)।निच्छय झगडयाचा मांडला ।बाणा - बंदुकांचा रे वर्षाव एक झाला ।(जाधवराव, त्याचे लेक रघुराव, यशवंतराव, रुस्तुमराव आणि सहाजण शिपाई गठच्या गठ बसला.)११यशवंतराय बोले रायाला राव रजा द्यावी मला ।त्यानें वोढली समशेर जाऊन भारावर लोटला (तर तो)।मारी कर्डा हात दाणादाण राऊताला ।(की) पंधरा हजार घोडा, फळी फोडून पल्याड गेला ॥१२(सर्जाखानाचा मेव्हणा काशिमखान मुंडया हौद्यांत) ।(उपटुं बाण बाबा जाऊं दे प्राण यशवंतराव मेला)।जाधवराव बोले वचनी, यशवंतराव पडले रणीं ।आणि आज बाजु राखायला निर्वाणीं नाही कुणी ॥१३मग रघुरायाची करणी झगडा खेळे झोट धरणीं ।भांडतो निर्वाणी वाघ मोकळे सोडूनी (तर ते)।बाणाचे पूर वर बर्शाच्या शिंपणी।की येका आगळ एकवीस्स जखमा रघूजी लागूनी । रघूजीनें झगडा केला हा तर जिवानिशीं वांचला ।गळा घातली कमान रुस्तुमराव पाडाव केला ॥१४जाधवराव रणामधी निघाला (रे)।ढाल पट्टा पडताळिला ।एक करतो पायिं स्वार्या।एक राखितो खाशाला ।हाशाजी सुराजी आवल भांडती बिनीला ।करून घनचक्कर हात दाविती खाशाला ।झगडा रणतुंबळ गाजला ।दावजी कंबळजी लोटला (आहो)।कडर्या संभाजीने निर्वाण झगडा दिला (आहो)।मनगट तुटून शिरीची जखन हासाजीला ॥१५(जाधवरावांचे तीन मुलगे व सहा शिपाई पडले)।जाधवराव चालला निर्वाणीं तिथ झाली खणाखणी ।मुंडामुंड पाडिले एका चढी एक दारुणी ॥१६जाधवरा आवखंदा सांपडला घेरा रावतांचा पडला ।(कीं) एक एक म्हणती जितच धरा दत्ताजीला ।(तर) पिळा आंगाचा मारिला ।हात रे त्यानें जोरानें टाकिला ।झाला असे ठणका हातचा गुर्दा उडून गेला ॥१७(काशिमखान समोर आला) (त्याला जाधवाने मारल) जाधवरावाची जोडयाची अणी हत्तीच्या पायांत गेली. सन्मुख लागली जखम, चक्री लागली डोळ्याला, जाधवराव पुरा झाला. १८जाधवराव पडला म्हणून ऐकीला ।सर्जाखान धावून आला ।कापिलं शिरकंबळ लंगर (कडें सोन्याचें) हातचा काढिला (तर त्या)।निलंगे मैदानी सर्जाखान यशवंत झाला ॥१९(जाधवरावाची बायको बहिणाबाई) (तिचा भाऊ झुंजारराव)।बंदा शिर मागाया गेला ।सर्जाखाना सलाम केला (आहो)।बंद्या द्याहो, शिर, सर्जाखानाशी बोलला ।सर्जाखाना क्रुध आला ।बंदा दाणून बोला ।उमरावका शिर मैं भेजुंगा दरबाराला ॥२०घाडग्यांनी बोल केला आपला सोयरेधर्म राखिला ।शिर घेतलें मागून बंदा वाटेस लाविला ।(तर ती) शिरा रोंडा भेट केली रचिलें सरण ।बहिणाईच्या आंगी जैसा चर्चरिला चंदन ।(तर ती) लेवून बरवी कास दिसे रुद्रयवगीण ।हत्तीवर बसून दिसे स्वर्गीचें इमान ।(दल्लेलखान सतीच्या तेथे आला)॥दिल्लीच्या बादशहाने देणग्या दिल्या त्यांत घनचक्करराव शिपाई होता त्याने हा पोवाडा केला. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP