श्रीमंत ईश्वरी अंश धन्य तो वंश परमपुरुषाथी । बरोबरी तयांची कोण करिल पहाताथीं ॥धृ॥
राजधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत । भासती सदैव देव आमचे हेच भगवंत ॥ पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत । त्या पूज्य परंतु नाहींत प्रगट जीवंत ॥ तसे नव्हते हे तर देव, कलिमध्यें भूदेव, ब्राह्मण संत । त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥(चाल)॥ योग्यतेस आणिले पंत होऊनियां कृपावंत, त्या राजांनी, ह्या मुळेंच चढती कमान धरून अभिमान ......॥ मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥(चाल पहिली)॥ पुढें प्रधानपद मिळवून, वैरी पळवून, मारिल्या शर्शी ॥श्रीमंती०॥ ॥१॥
राव बाजी पुण्यामध्यें घेऊन, हातावर घेऊन, निघाले, शीर । प्रारंभी पाहिलें जनस्थान रघुवीर ॥ नेमाड माळवा मुलूख, करून सरसलूख, मोडिले वीर । मोवाडचे राजे न धरती धीर ॥ गढमंडळ बुंदेलखंडल डंघईत, अखंड राहून थंड, सही केलें । प्रतापें करून या जगांत नांव मिळविलें ॥(चाल)॥ बुडविनी या बहाद्दरास, आणली घरास, माषुक मस्तानी । दरवर्षी घौशा घालून, जावें जालून, अघाडीस मस्तानी ॥ शह दिला नगर थेटपास, खु..... । .....॥(चाल पहिली)॥ उपरांत नर्मदा कांठी, सार्थकासाठी, मोक्षकार्याथीं । देह समर्पिला त्या स्थानीं याच भावार्थी ॥श्रीमंत०॥ ॥२॥
तेजी दुनियेमाजी धन्य न मानी अन्य, वंदिती स्वामी । जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामीं ॥ तीन नर्षें राज्य बसवून, मोचें बसवून, सभोंवते धमामी । सुरुंगांनी । सुरुंगांनी पडिला अलगत बुरुज बदामी ॥ हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामीं । नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामीं ॥(चाल)॥ बक्षीस दिले कडितोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्या । ठायीं ठायीं दिमती दिमती भरभरून, आंख ठरवून, सजीवल्या सरदार्या । पराशत्रू होईना खाक वांटूनी परख, तशाच हवाललदार्या ॥(चाल पहिली)॥ खूब केली तुम्हीं तलवार, नांवनिशीवार, म्हणून किती प्राथीं । यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत०॥ ॥३॥
बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी । आणिलें पुण्यांत जपानी नळाचें पाणी ॥ जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धूम - घाणी । त्या सालींच बंगाल्यांत घातलीं ठाणीं ॥(चाल)॥ लागलेंत केले कूच, स्वारी दरकूच, परली सगळ्यांची ॥ लष्करांत केवडा गजर, होई नित्य नजर, मोतींमणिपोवळ्यांची ॥ वांटून खिचडी रमण्यांत, आनंदे पुण्यांत मोहरा पुतळ्यांची ॥(चाल पहिली)॥ खुप गेले शास्त्रीपंडीत, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी । गेले कीर्त गात ते ब्राहण तीर्थोतीथी ॥श्रीमंत०॥ ॥४॥
शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ । दादाही गणावा त्यांत, बाण भात्यांत, भाताचें ताट ॥ भलत्याच ठिकाणीं घाली रिपुशीं गांठ । तिन्ही काळ निरंतर साधी, जातीनें बांधी, हत्यारें आठ ॥(चाल)॥ फेडून नवस माहोरास, केले लाहोरास, जिंकीत शेंडे । अरे जपानी सहज अटकेंत, पाव घटकेंत लविले झेंडे ॥ सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दुल गेंडें ॥(चाल पहिली)॥ पुढें चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामीकार्यार्थीं हे पुरुष म्हणावे श्रेष्ठबंधुचे स्वार्थीं ॥श्रीमंत०॥ ॥५॥
भाऊसाहेब योद्धा थोर, अंगामध्यें जोर, पुरा धैर्याचा ॥ विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥ दोहों बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा । किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥ दृष्टान्त किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा । शेवटीं बिघडला बेत सकळ कार्याचा ॥(चाल)॥ कितीकांची बसली घरेंच, हें तर खरेंच, ईश्वरी कृत्य । शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून पावले मृत्य । कवि गंगु हैबती दीन, पदांबुनीं लीन, कृपेंतील भृत्य ॥(चाल पहिली)॥ महादेव प्रभाकर ध्यावी, सदा गुण गाईल यथासाह्यार्थीं । श्रीमंत पभूची कीर्तं जशी भागी - रथी ॥श्रीमंत०॥ ॥६॥