महाद्जी शिंद्यांचा पोवाडा - मानवी तनू अवतार धरूनी केल...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
मानवी तनू अवतार धरूनी केली चौदेशी सीमा ॥ माहाक्षेत्री जन्मले केवळ विषकंठ प्रतिमा ॥ मारूनि आरते जेर जेर केले नसे कुणाची तमा ॥ मारवाड गुजराथ आटकवर रिपुशी आणिले दमा ॥ महाराज श्रीमंताशी मान्य ॥ शिंदे माहादजी क्षेत्री जन्मले केला वंश धन्य ॥धृ॥ ॥१॥
हरिभजनी निशीदिनी ज्याचे शूर प्रतापीमहा ॥ हे वारण झुलती सदोदित प्रत्यक्ष नयनीं पाहा ॥ हुट अंबीर जयाचा सर्वावरता शाहा ॥ हाल धराया कवण न दिसे करी पावन तृण दाहा ॥ साहेब पडूं देईना न्यून ॥२॥
दया शांती गुरुभक्तीचा अखंड आनंद ॥ दर्पे रिपु कांपती स्थापिले बाच्छाई पद ॥ दर्शन घेता माहावीराचे उतरती मद ॥ दखण नवखंडांत बादली शूरत्वाची बीरद ॥ पूर्वी आचरले बहु पुण्य ॥३॥
जितेंद्रिंय बुद्धीवंत उपमा साजेना दुजी ॥ जिकडे जावें तिकडे फत्ते भले मर्द गाजी ॥ जिलीब चाले घनघोर सदा तत्पर स्वामीकाजी ॥ जितक्या तितक्या कळा प्रगटल्या दावी जगामाजी ॥ वीर पाहुनी होती मौन ॥४॥
सिंह प्रतापी आगळा तद्वत शिंद्यांचे वंशीं ॥ सिंदे महादजी क्षेत्रीं जन्मले जाहीर पृथ्वीसी ॥ सिंव्हासन नालखी बाच्छायानें दिली श्रीमंतासी ॥ सीमा देह ठेविला स्वामी चरणापासी ॥ जाली त्रिभुवनी शुन्य ॥५॥
देश मुलूख संपदा आटकवर रयत ज्याची नांदे ॥ देऊनी आभय सदा निर्भय क्रिडतसे छंदे ॥ देखनाख समज षडाक्षरें महादजी शिंदे ॥ काशीराम शरण शरण आनंदे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP