मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| पंढरीराया करा दया हालीव स... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा खडकीची व अष्टीची लढाई - पंढरीराया करा दया हालीव स... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - रलू केरू ( चाल - खबर ऐका बदामीची ॥) Translation - भाषांतर पंढरीराया करा दया हालीव सूत्र निर्धारीं । चला करूं पंढरीची वारी ॥ध्रुपद॥शके सलाशें एकुणचाळीसांत श्रीमंत आले आषाढीला । अंत लागेना फौजेला ॥ चौफेर दिले दलबादल डेरे गोविंदपुर्यासमोर । गोखले आणि विंचुरकर ॥ लोक सरसा अरब खासा श्रीमंताचे बरोबर । उतरले पद्म तळ्यावर ॥ फिरंग गोरा पठाण तेरा गोपाळपुरचे ओढयावर । रास्ते पटवर्धन मोहरें ॥ सैन्य जमलें बहू रमले आनंद झाला महाद्वारीं । चला करूं पंढरीची वारी ॥१॥बेदशास्त्र संतचार कल्पना घेती साधुजन । आज पंढरी दिसती शून्य ॥ गंगाधरशास्त्री पुण्यपवित्र जात होता रस्त्याने । केवळ विष्णु भगवान ॥ पुढे मागें लोक संगें मशाला जळती जोडयानें । शास्त्री हो चाले सोवळ्यानें । कोणी मसलत केली गफलत ठाईं ठाईं बसले जपून । घांव घेतली कर्मानें ॥ तस्करानें जलदी करून हात मिलविला जाऊन । मशाला पडल्या गळून ॥ पडला वार झाला ठार प्राण वरचेवरी ॥जला करूं०॥ ॥२॥झाली गर्दीं नाकेबंदी कोणी पुसेना कोणाला । लोक वागेना रस्त्याला ॥ मशालजीनें जलदी करून खबर पोंचविली सेनेला । शास्त्रीबोवा ठार झाला ॥ लोकबळ मायाजाळ घळघळ रडती बावाला । कसा वैर्यानें घात केला ॥ मानकरी होते पदरी पाणी आणितो डोळ्यांला । आमचा पोशिंदा गेला ॥ कारकून पडले शून्य हुजर्या स्फुंदत स्फुंदत द्वारीं । कसा कोपला श्रीहरी ॥चला करूं०॥ ॥३॥किल्लेदार मर्दशूर ताकीद केली सेनेला । आरबी बाजा फडफडला ॥ कारकून बसुनशान मनसूब रायानें केला । पत्र पाठवा फिरंग्याला ॥ घटका रात्री गंगाधर शास्त्री जात होता देवाला । मधी खपविला रस्त्याला । त्या वेळे झाला काळ उशीर नाही घटकेचा झाला । प्रेत जळत तीराला ॥ फिरंग्याला क्रोध आला मुत्सदी कोणी मारला । हाती कलम घेऊन पडला ॥ रात्रसमयी पत्र लिहिले लखोटा कुंपणीला गेला । अवघा वर्तमान लिहिला ॥ कुंपीने पत्र पाहनू प्रभूशी जप्ती करी भारी ॥चला करूं०॥ ॥४॥सेनेंत झाला बेत घाबरें झाले लष्कर । जीन ठेविलें घोडयावर ॥ दर मजली फौज शिणली घाट उतरून गेले पार । दाखल झाले पुण्यावर ॥ कुच केले निघुन गेले मुक्काम केला वेळापुरावर । गस्त फिरंग्याची तुरुकस्वार ॥ चौफेर लाला गोल वाजवी तंबुर बासरी ॥चला करूं०॥ ॥५॥शुक्रवारी प्रहर रात्रीं मनसूबा करती आवघेजण । द्यावी चवथाई लिहून ॥ गोखल्याला क्रोध आला लैन काढीन कापून । टोपी झाडाला लावीन ॥ नानाभाऊ दिल्लीस जाऊं जरीपटका सोडीन । बसवूं दिल्लीचे ठाणें ॥ दिल्लीवर सवा प्रहर भाऊनें झेंडे लाविले । बादशाही तक्त फोडीलें ॥ रणी पडले नाव केले वंश क्षेत्र्याचा अभिमान । लढाई घेऊम जातीनें ॥ तह ठरला लढाईला कंबर बांधीली गोखल्याने । खवळला व्याघ्र पंचानन ॥ स्वार झाला निघुन गेला फिरंगी गारपिरावरी ॥ श्रीमंत आले नागझरी ॥चल करूं०॥ ॥६॥आदितवारी पहिले प्रहरीं घालमेल झाली सैनेची । तयारी दारूगोळ्याची ॥ सुरु तोफा सिपाई बाका पाठीमागे वामनराव पंची । सिस्त मोठी गोलंदाजाची ॥ गोसावी नंग पिऊन भांग हातीं घेउन समसेर कमची खबर आम्ही घेतों फिरंग्याची ॥ लोक उमदी आरब सद्दी फौज आली पाटणकराची । हवा काय दिसती अंबारीची ॥ निपाणकर पुणेश्वर फत्ते तलवर गोखल्याची । बिकट लढाई कानडयाची ॥ फितूर होता ठाव नवता चोर बातमी फिरंग्याची । तयारी झाली लैनेची ॥ पुढे लैन मधी सैन्य बाजूनें दाटी तोफेची । पिछाडी तुरुक स्वाराची । साहेब गोरा तीनशें बारा काढिलीं कुलुमें मेण्याचीं । दरद नाहीं त्याला मरणाची ॥ दारु प्याला निसंग झाला हातामधी झमके तरवारी ॥ जसे कांहीं पांडव क्षत्री ॥चला करूं०॥ ॥७॥तोफ सुटली लैन उठली कडाका पहिला आरबाचा । देवडी मार कानडयाचा ॥ गोसाव्याने लगट करून मार बसवी तिरकमटयाचा । पाडिला खासा लैनीचा ॥ आलपिष्टान जलदी करून बुरुज बांधिला फिरंग्याचा । दुहेरी मार तोफांचा । केली हल्ला मधीं शिरला सोडवी गळा कानडयाचा । बंद कापिला गोसाव्याचा ॥ सात हजार गारदी ठार अंत लागेना आरबाचा । लोक फार पडला गोखल्याचा ॥ गोखल्यानें उलट करून वार टाकिला गोर्यावरी । रीघ निघेना उपाय चालेना फिरली स्वारी ॥चला करूं०॥ ॥८॥रण घुमलें कतल झालें पूर अशुद्धाचा वाहिला । स्वर्गी घंटा वाजला ॥ बाराभाई शिंदेशाई मार्ग त्यांनी काशीचा धरला । फिरंगी पाठी लागला ॥ दरमजलीं फौज शिणली दाखला पंढरीस आला । मुक्काम त्याने आष्टीचा केला ॥ अष्टीवर लढाई फार मानकरी थोर पडला । गोखल्याचा अंतकाल झाला ॥ श्रीमंत भयाभित पळुनी घाटपार झाला । पवाडा कटिबंध केला ॥ रत्नू केरू नाथबहिरू आखाडा महशूराने केला । चंद्रभागेच्या तीराला ॥ छंद झाला बसुन केला हणमंताचे पारावरी ॥चला करूं०॥ ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP