मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
धोशा धुळपाचा अति आनंदराव ...

आनंदराव धुळप - धोशा धुळपाचा अति आनंदराव ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


धोशा धुळपाचा अति आनंदराव रणशूर । मारिला + + + + ॥ध्रु.॥ फाल्गुन मासीं राव निघाले बाहेर । पाल गुलाब त्यांनी सजवुनियां आरमार ॥ ओढिले नांगर पुढें जायाचा करार । राहिलें वारें केला मुक्काम वाघापूर ॥ दुसर्‍या दिवशीं आलें इंग्रजांचें आरमार । सत्तावीस मनोरे भरोनी वाहे भरपूर ॥ अभिमान भारी इंग्रजांस अहंता फार । रामचंद्रांनीं वधिला दशशीर ॥१॥

बाहिर सावध होया आहेत राहत्यारे राज्याची । लावली नाळ केली हंकारणी पालाची ॥ जलदी केली भर उमेद लढायाची । अडकलें तारूं फिरंगी रयत कोणाची ॥ हिरे हिरे मारून सोई धरिली किनार्‍याची । दया संपूर्ण धुळपावर रामलिंगाची । पुढें शाहुचा जरीपटका बिनीवर ॥ उडविला चांचा त्यानें ओढुनि केलें दीनमोर ॥२॥

विलायत जंजीरा नवकुलपांचें तारूं । शिरीं हात ठेवून पाठविला दक्षण वारू ॥ घेतली गुजराथ वसई केली जेरू । लढुनि शिंद्याशी पाडाव केले डेरू ॥ कपींद्र भारी नऊ पालखीचे सरदारू । राव धुळपांनीं त्यांना मारून केलें जेरू ॥३॥

मसलत होती हैदरावर जायाची । बोट ओढती सातशे गारदी त्याची ॥ रामप्रसाद आहे गुरूब चालीची । लक्ष्मण धुळप ऐके न गोष्ट कोणाची ॥ सोडिले मचवे लोक चढती काठीवर । राव ते मोठे बुद्धीवंत सरदार ॥ दांती तृण धरुनी उडी टाकिती बाहेर ॥४॥

इंग्रजांला धास्ती नव्हती कधीं काळाची । अवचित गांठ पडली आनंदराव धुळपाची । नदी वाहते वाहते हो अशुद्धाची । तीन साठ शिरें उडविलीं त्योनं +++॥+++++। घायाळ मुदें घुमति राव फार ॥५॥

रत्नागिरीचे कागद पुण्याला गेले । रावसाहेब वाचुनि खुशाल झाले । सांगे श्रीमंताला धुळपांनी नांवाचे नक्षे केले । सत्तावीस गोरे धरूनि त्यानें आणीले । अठ्ठावीस गोरे धरूनि त्यानें कापीले । डफ झांज वाजताती चावडीवर । पोवाडा केला पुण्यामध्यें बसूनी ॥ पोवाडा केला भिक्या बाळा यांनी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP