मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| केले दंग समशेरजंग इंगरेजा... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा डामाजी नाईकाचा पोवाडा - केले दंग समशेरजंग इंगरेजा... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी डामाजी नाईकाचा पोवाडा Translation - भाषांतर केले दंग समशेरजंग इंगरेजाला । सागरी राहिले छत्र बुडाला किल्ला ॥धृ॥घडीवेळ उत्तमा पाहून केली मांडण । धन्य धन्य कारागीर चतुर शाहाण । सरसुभा विसाजीपंत धनी होत जाणा । केलें तयार समशेरजंग वसई ठिकाणा । सांचांत ओतून काढिला जसा नगिना । शोभे वरि बोरदासारिखा अचंबर दाना । तिनकाठया उडवी ध्वज । झाझांत सवाई झाज । नांव समशेर जंग साजे । जैसा सैनामधि हत्ती गर्जे । इहिदे सबईनच्या सालांत गेले गोव्यांला । ते दिवशी समशेरजंग आले विजयदुर्गाला ॥केले दंग०॥ ॥१॥सुभा झाला धुलपरायाला आरमाराचा । नारायणपाल महादेवपाल दत्तपालाचा । फत्तेजंग समशेरजंग जोडा दोघाचा । अवघ्यामध्ये समशेरजंग बिनीचा । थोर थोर मांडिल्यावर मोठये गोळ्याचा । निवडून सिपाई चढविला भरवशाचा । दारुचा तरास पाण्यांत । फिरंग्याशीं धाक गोव्यांत । सारी पाडाव केली सपाट । कैकांशी पडली धास्त । सवाई समशेर नांव... दामाजी नाईक सरदार तोचि बिनीचा ॥केले दंग०॥ ॥२॥सन खमस साल येंदाचे फार कठिण । ठाण्याचा किल्ला घेतला इंग्रजानें ॥ पत्र आले धुळपरायासी यावे बेगुन । निघाले बंदरांतून आरमार घेऊन । दरकुच रेवदंडयावर गेले चालुन । कांही दिवस कर्मिले घ्या ऐकुन । बार बार हिंडु लागले । नांवाचे जानराव धुल्ले । चारमास झुजे मारिले असे माही सुध । पाडवा बुधवाराला । गोपाळगडचे बार्यावर इंगरेज पाहिला ॥केले दंग०॥ ॥३॥सारे पाल जवळ बसून मन्सोबा केला । महादेवपाल नारायणपाल समशेरजंगाला । तुह्यि कोठे एक बाजून घालावा घाला । आम्ही येतावो आतून मदत तुम्हाला । पुढे होऊन समशेर दमानी पडला । न कळे कर्त्यांची कर्णी वारा राहिला । सारे पाल राहिले दूर । ना ऐक भांडयाचा मार । इंग्रेजास मदत ईश्वर । दोन जाजें त्याचि जबर । एकला पाहून समशेर । मारामार करूं लागला गोळ्यावर गोळा । नाही ऐके समशेरजंग खूब भांडला ॥केले दंग०॥ ॥४॥इंग्रेज पुसे हटकून कोण सर्दार । दामाजी नाइक म्हणे मीच बादुर । कपितान मनी उमजला धनी यावर । म्हणून झडून पडला समशेरावर । दोहीकडे दोनीं जाजे करिती मार । खुब झुजला समशेरजंग तीन पाहार । कांहि केल्या आटोपेना । दंग जाला इंगरेज मना । ‘घ्या घ्यारे कौल भेटांनां’ । ‘लोक म्हणती न येऊ शरणा । करूं पेशव्यांची नामना । सती होऊन बसलों सरणा । ये येरे टोपीवाल्या अडावणीला । आह्यी पेशव्यांचे शिपाइ निमख दाउं तुजला’ ॥केले दंग०॥ ॥५॥इंगरेजास आला राग झाला सरमिंदा । भरभरून भांडी मारि दोंहिं बोरजा । दांडीचे गोळ फार करितो चेंदा । रेजगिरी सांखळी मारुन उडविला पडदा । मारली थोरली कांठी गावी परबाणसुद्धां । तक्ता फोडून केला जुदाजुदा । लोक भांडले भार शर्तिन । जति हिंदु मुसनमान । दामाजी नाइक धन्य । केलें हलाल धन्याचे अन्न । पाल नेइल वैरी म्हणून । दिल्ही आपल्या हाती अग्र । सवाई समशेर जळू लागला ॥ दामाजी नाईक शर्त करून मेला ॥केले दंग०॥ ॥६॥किति उडाले दारून जळाले फार । काही उडया टाकुन गेले तक्त्यावर । गेलि वस्त्रें नि पांघुरणें आणिक हातेरे । कसा गिलजा धात (?) पडला एकच कहर । या पेशव्याचे राज्यांत फार अमर । (पर) कोणि जळुन नाही मेला असा सर्दार । झुज झाले मिरया ठिकाणी । काहि गेले रत्नागिरीवरुनि । खुब केले त्या सुभेदारांनी । एकेक शेला दिला पाहुनी । कांही नेले इंग्रेजांनी । आले जखमी लोक खबर कळली लहान थोराला । कसा कहर राज्यावर पडला मोठा गलबला ॥केला दंग०॥ ॥७॥मोठया पहाटेस दिवस उगवला न राव आले । इंग्रेज पळून गेला असे कळले । आइकोन वर्तमान कष्टी झाले । गेलीं फत्येजंगाची बाजू देवा काय केले । वर्तमान ऐकून तेथून निघाले । गेले विजयदुर्गाचे बंदरामध्ये पोचले । सारे पाल गोदी घालून खाली उतरले । जे रणी राहिले खेत जिवाशी मुकले । किती हेटकारी झाले ठार । घ्या रुपये ढालाभर । राज पेशव्यांचे अंबर । बातनी विजयदुरुगावर । गुरु आत्मागिरि फकीर । दामाजी आमचा मैतर । ख्यालगातो जीर खान खानदेशाला । हालीं वस्ती तळा घोसाळा ठाउक सर्वाला ॥केले दंग०॥ ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP