मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
पुण्यप्रतापी धन्य जगामधि ...

हरबाजीराव धुळपांचा पोवाडा - पुण्यप्रतापी धन्य जगामधि ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


पुण्यप्रतापी धन्य जगामधि धुळप राव हे कीं ॥ रणबाहादूर हरबाजीराव थरथराट जनलोकी ॥धुवपद॥
हटी मूर्त गोमटी भोळेशंकर बोलण्यांत ॥ वक्त्र भयासूर पाहता कंप भरे शरीरांत ॥ धुंद कैफमें बुद्धी अकडबाज शोभिवंत ॥ दिसे सांवळी तनू दोंद गणपतीचे दिसण्यांत ॥ बीर मारुती वीर उदार कर्ण तसे देत ॥ कडक स्वारी तडक जिलेबी चाले यशवंत ॥ तुरा शोभतो कुरा जयाची मोठी दहशत ॥ साहाकारी आनंदराव मर्यादा पाळीत ॥ भैरी भूपाळ गैर भाषणें सोय लाविती कीं ॥रण०॥ ॥१॥

रंग विलासी दंग इमानी खातर धन्याची ॥ ऐका श्रीमंताचा घोडा अचाट होता ॥ धनि ऐकती कर्णी कीर्ति बसणार रावजीची ॥ बडा खंकाळ घोडा त्यावर उडून बसले जी ॥ दिला सपाटा त्या घोडयाची खोड मोडली जी ॥ ख्यात जयाची विख्यात निशा जाहली खावंदाची ॥ शिरपेच घोडा बक्षिस दिला तेधवां जी ॥ भगवंताचे लाल खरे सर्व मानिती की ॥रण०॥ ॥२॥

बाहादूर हे पाहा यशस्वी जरीपटका झुले ॥ जयगडच्या बार्‍यावर मनवर येती मुंबईवाले ॥ जोर इंग्रजी थोर अंगावर तुटून हे पडिले ॥ नांगर सोडूनी खासे झुजासाठी आडीस आले ॥ भांडी पेटविता सांडी गर्भ साठांचे गोळे ॥ मोठी झीमाझीम जाहाली कडाड तोफांचे सुटले ॥ रागें न फिरे मागें काय अनर्थ घडले ॥ पटपट मुडदे पडतां मनवर निघूनियां गेले ॥ अशा किती एक गलिमा मारूनी हटविती कीं ॥रणी०॥ ॥३॥

जीत देवही भीत वृत्तांत ते गंगेवरचा ॥ आली नव्हती गंगा कुंडामध्ये सत्य साच्या ॥ आहाट करिती बोभाट ब्राह्मण वेदघोष त्याचा ॥ जय मातोश्री गंगा उपाय हरे सकळांचा ॥ जसा भगीरथें सहास करार केला शरीराचा ॥ नये माउली गंगा उपाय हरे सकळांचा ॥ त्या गायमुखाखाली बसका रावजीचा ॥ म्हणती आता देणें लाभ तुझ्या दर्शनाचा ॥ वाहू लागल्याविना उठेना धट निश्चयाचा ॥ भाव पाहुनी धांवे गोमुखी वाडे लोट गंगेचा ॥ केलें स्नान दक्षणा वाटती हर्षयुक्त ब्राह्मणांसी ॥ धन्य धन्य अवतार मानिती आश्चर्य म्हणती हे आवतारी कीं ॥रण०॥ ॥४॥

राव साजते नांव जोडी हो रामलक्ष्मणा ॥ आनंदराव हरबाजीराव धुळप बंधु जाणा ॥ धन्यांनी जावे पुण्यास असे आले घडोन ॥ गेल्यावर दुष्काळ कोंकणी पडला येवोन ॥ मेले कितीक गेले जाया भंगासी घरें सुन ॥ एकनिष्ठ पुण्याहुनी सहावें वर्षी आले फिरोन ॥ जेव्हा पाहिली तेव्हा स्वारी गेली हौसेने ॥ धरोन आणिली बोट तांदूळ देती आनंदान ॥चाल॥ अन्नवस्त्र विपुल जाहले दुष्काळ पळाला की ॥रण०॥ ॥५॥

वर्णितात हो करणी ज्याची श्रीमंत अझून ॥ सत्राशेंसत्रांत आलें घडोन ॥ तुटे आयुष्य सोडी हरबाजीराव प्राण ॥ मार्गशीर्ष शुद्ध तृतीया उत्तराषाढा जाण ॥ मृत्यु येई हा भृत्य शिवाचा सोमवार धन्य ॥ दोन प्रहरी वैकुंठी आत्मा गेला निघोनी ॥ घोळंकार कल्होळ पडे आभाळ कोसळोनी ॥ दादा बापू काकी गेला मूर्च्छित होऊनी ॥ शुद्ध बुडाली बुद्ध मेरु तो गेला खचोनी ॥ मोठा आकांत झाला वाईट केले ईश्वराने ॥ जगांतील ही सर्व रडती बापू कष्टी जो की ॥रण०॥ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP