मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा नानाफडणिसांचा पोवाडा - श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - बाळा बहिरू ( चाल - श्रीमंत महाराज पेशवे अमोलिक सुतींमोती ॥) Translation - भाषांतर श्रीमंतमहाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा । खुप युक्तीनें राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ॥ ध्रु०॥रतिवंत महाराज पेशवे माधव विष्णू अवतार । हिंदुस्थान कर्नाटक तेलंगण काबिज केलें सार ॥ घरिं बसल्या घरिं खंडण्या येती वृत्तांत ऐका साचार । शिंदे होळकर गाइकवाड नामी नमी सरदार ॥ जाट रोहिले पठाण कांपति राजे उदापूरचा राणा । खुप युक्तीनें०॥ ॥१॥जरीपटक्याचें निशाण तात्या हरिपंताला सरदारी । चौखंडांमधिं घौंशा वाजतो कइकांला दहशत भारी ॥ हुजरातिची जिलीब चालती मानकरी सेना सारी ॥ पाटणकर घोरपडे निंबाळकर तलवारीचे धारकरी । अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । खुप युक्तीनें०॥ ॥२॥भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार । मर्दानें हो राज्य राखिलें मनसोबीच्या तलवार ॥ इंगेजाला खडे चारिले नाहीं लागुं दिअल थार । दर्यामंधीं पिटून घातले काय सांगू वारंवार ॥ बदामीचा किल्ला घेतला असा पुरुष नाहीं शहाणा । खुप युक्तीनें०॥ ॥३॥भले बुद्धीचे सागर बुद्धीवंत बुद्धीचे सागर । दुष्टाचें निर्दाळण करुनि राज्य राखिलें एकछतर ॥ श्रीमंतांच्या वाडयामधीं सबनिस अण्णा खेडकर । कुल अखत्यारी बंदोबस्ती बाळाजीपंत ठोसर ॥ नानापरिचे विलास करितो जैसा गोकुळीं हा कहाना । खुप युक्तीनें०॥ ॥४॥लक्ष धन्याचे पायीं चित्तापासुनि हा ज्याचा भाव । पहा राइचे पर्वत केले वाढिवले माधवराव ॥ लग्नासाठी आणले ज्यानें मोठे मोठे उमराव । जागजागीं दिल्या बैठला अनंत होतो उच्छाव ॥ तखतराया रथ ह्त्तीचा पुढें वाजे नौबतखाना । खुप युक्तीनें०॥ ॥५॥राव बाजीचे पुण्य प्रतापी पुणें शहर केवळ काशी । गोब्राह्मणां प्रतिपाळितो दक्षिणा श्रावणमासीं ॥ टिकून धनया धन्य म्हणजे या पेशव्याच्या वंशाशीं । बाळा बहिरू करी कविता बसूनियां नित्य गासी ॥ सेवक सिताराम ज्यांचा दशनामीं भगवा बाणा । खुप युक्तीनें०॥ ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP