मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा आळत्याची लढाई - तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - जिवाजी पांचाळ ( चाल - दक्यनच्या पेशव्याशी घाला कधी नवता आला ।) Translation - भाषांतर तासगाव अपूर्व परशुरामभाऊचें शहर । गणपतीचा उत्साह होतो हरिस्मरण गजर ॥ध्रु०॥भाऊसाहेबांचा नित्य नेम त्याचें दर्शन घ्यावें अगोदर । असे एक धनी श्रीमंत त्याला पेशव्यांचा आधार । पुण्यप्रताप नांव थोर आलें श्रीमंताचें पत्र । पाहिला वाचून मजकूर ॥(चाल)॥ मग आणूनिया ध्यानांत । डेरे दिले पाहून मुहूर्त ॥ वाजे नगारा नौबत । कुचावर कूच करीत ॥(चाल)॥ गेले सालप्याच्या घाटा धनी उमराव ॥ तेथें बसून मसलत केली जलदीनें यावें ॥ मुळेमुठेवर पुणें गांठावें । असें कळेल श्रीमंताला हुजूर धाडावें ॥ धाडुनियां हुजूर भाऊशी आणिलें वाडयांत । श्रीमंताच्या भेटी झाल्या बहु आनंदांत ॥ तासगाव किल्ला अजब तर्हा झाली रचनुका केली दक्षिणेंत । परशुरामभाऊंनीं केली चौखंडा कीर्त ॥तासगांव०॥ ॥१॥सवाई माधवराव भाऊशीं बोले वचन । करवीर कोल्हापूर आतां तुम्ही घ्यावें जाऊन ॥ तीन लाखांची खंडणी हुंड घ्यावी उतरून । महाराजाशीं कैद करावें बसवावें ठाणें ॥ श्रीमंतांचें वचन ह्रदयीं धरिलें भाऊनें । आणलें जरतार पांघरुण ॥ वस्त्रें केली पेशव्यानें । चाले निरोप घेऊन ॥ सोडिले त्या दिवशी पुणें ॥(चाल)॥ मग निघालें लष्कर । केले कुचाचे नगारे ॥ नदी उतरून झाले पार । ढाल दिली कात्रजेवर तळ पाहून ॥ आले रहिमतपुरावर चालून । दरकुच करीत चालले कड निकडीनें ॥ आले तासगांवाशीं केलेलं देवदर्शन । घेऊनियां दर्शन मग भाऊ गेले वाडयांत ॥ पाहून आपासाहेबास भाऊंनी केली मसलत ॥तासगांव०॥ ॥२॥भाऊसाहेब आपासाहेबाशीं काय बोले । सरंजाम कराया आपासाहेबांनी पत्र लिहिलें ॥ गांवोगांवास लिहिली पत्रें खासे मिळविले । सरंजाम करून डेरे राहुटया बाहेर दिले ॥ घेतला निरोप आपासाहेब बाहेर आले । गणपतीशीं नमन करून मग पालखीत बसले ॥ हत्ती कुंजर शृंगारिले ॥ भडक जरीपटके सोडिले । पुढें चालती कोतवाले ॥ भगवी ढाल पुढें चाले । मग निघाले सरदार तळ नेमिला कौलापुरा ॥ ढाल रोविली येऊनि मोर । गांवोगांवचे शिल्लेदार ॥ असे जमले की दहा हजार । भडक सरदार ॥ दरकुच सोडिले तव उतरले मोर । येऊनि ढाल रविली कृष्णातीर ॥ ते वसूनि आपासाहेबांनी केला विचार । तोफा लावाव्या आळत्यास नका उशीर ॥ सुभेदारासंगं तोफा दिल्या बरोबर । घेऊनियां गारदी फिरंगी गेले अळत्यावरतीं ॥ दुहेरी लाविल्या तोफा वेढा पडला सभोंवतीं ॥तासगांव०॥ ॥३॥सकाळचा दिवस प्रहरभर आला उगवून । गांवकुसवाशी तोफा लाविल्या सुभेदार जनोबानें ॥ खर खर खर खर लिहून पत्रें जासूद धाडून । फोडूनियां लखोटे वाचिले आपासाहेबानें ॥ केलें सैन्य तयार सडी स्वारी संगें घेऊन । जरीपटक्याचा ह्त्ती बिनीवर चाले निशाण ॥ गेले अळत्यावर चालून । हल्ला नेमिला रायानें ॥ केला अळत्याचा संहार । दिस होता दोन प्रहर ॥ गेली महाराजास खबर । धनी बसले सरदेवर ॥(चाल)॥ मानकरी निळाले थोर थोर प्रिताजी चवाण । मग सरदजेराव घाटगे आले चालून बोले रत्नाकर आपाजी फौज स्वाधीन ॥ हैबतराव गायकवाड बिनी स्वाधीन । मोहरप्याला लाविले हत्ती तक्त निशाण ॥ महाराज निघाले इतके सैन्य घेऊन । आले आळत्याचे जवळ ॥ बाजीराव माने खिंडींत । दोन टोळ्या करून पुढें गेले रत्नाकरपंत ॥तासगांव०॥ ॥४॥घनचकर मांडलें लागलें तोंड झुंजाचें । खणन खणन तलवार अशुद्धें वाहती रक्ताचें ॥ आपासाहेबांनि उठून पाहिले लोक राजाचे । हाणा हाणा बोलती मार उडाले गोळ्याचे ॥ स्वार भाले वारूवर सळ सोडिले फिरंगीचे ॥(चाल)॥ हैबतराव गायकवाड ओढला हत्ती निषाणाचा । वेढा पडला फौजेचा ॥ क्रोध चढला झुंजायाचा । गुंडाळा केला दहापांचांचा ॥ धडा मग केला जिवाचा ॥(चाल)॥आपासाहेब सरदार । फिरफिरून मारी तलवार ॥ असे दहापांच केले ठार । आले सरजेराव हंबीर ॥ आपासाहेब धरावा धीर । मग जाऊन धरले कर ॥ आणा पालखी चला लवकर घेऊन आपासाहेब आंत बसविला सर्जेंरावानें ॥ महाराज बसले होते पाहिले त्यानें । झाली दृष्टभेट ॥ दिले बादली पोषाख नवीं पांघरुणं । मंदिल मोत्यांचा तुरा दिला राजानें ॥ तीन पदरी मोहनमाळ जडित कोंदण । दोद गांवें बक्षिस दिलीं हातीं निशाणें ॥ आपा साहेबाशीं घालवा महाराजा बोले त्वरित । घालवीत चालले संगें सवों राउत ॥तासगांव०॥ ॥५॥इतकी खबर ऐकून मग भाऊ झाले वित्रास । कोलापुरची माती आणून मिळवीन कृष्णेस ॥ गांवोगांवांशीं लिहिलीं पत्रें मिळविले खासे । सरंजाम करून तळ नेमला कुपाडयास ॥ आकलीवर उतरले ढाल दिली कृष्णातिरास । खरखरखरखर लिहूर पत्रें धाडिलें मिरजेस ॥ धनी बाळासाहेब बैसले होते सदरेस । वाचून पाहिलें जीन ठेविलें वारूस ॥ चिंतामणरायानें हुकूम केला फौजेस । अंबारींत बसून रावा मग आले अकलीस ॥(चाल)॥ फार सांगितलें भाऊस जाऊं कोल्हापुरास । आतां नाहीं पुरयास ॥ याच प्रसंगीं घेईन यश । मान नाहीं केला शब्दास ॥ कागद लिहिले बावास । पत्र पाहतां या अकलीस ॥ केले कुचहुकूम ढालीस । गेले इचलकरंजीस । तिथेंच तळ पडला चार दिवस ॥(चाल)॥ तिथें जमाव सारा झाला । तळ उचगांवचा नेमला ॥ ढाल दिली पंचगंगेला । त्या टेमलाईच्या माळाला ॥ केली पेंढार्यानें हल्ला । कोणी खाईना उसाला ॥ दिले मोर्चें चौं बाजूंला सोमवारी नेमिली हल्ला भाऊ साहेबानं । मोर्चांत बसविले लोक खासे निवडून ॥ आले माहाराजांचे लोक बाहेर निघून । केली मोर्चावरती हल्ला पडले येऊन ॥ शेंपन्नास केले जखमी गेले परतून । म्हणे भाऊ साहेब आतां तुम्ही असा बंदोबस्त ॥ नका करूं गडबड कोल्हापुर घेईन क्षणांत ॥तासंगाव०॥ ॥६॥मंगळवारचे दिवशीं भाऊनीं केली ताकीद । गांव कुसुवासी तोफा लाविल्या केली हिकमत ॥ महाराजाचे लोक ते एकशूर नामांकित । स्वार झाले वारूवर आले जितीच्या वढयावरत ॥ भाऊसाहेबांनीं कमर बांधिली पट्टा हातांत ॥(चाल)॥ घेतला पट्टा हातात । गेले जितीच्या वढयावरत ॥ झुंज मांडलें पटांगणात । सूर्य झळकला गगनांत ॥ केली फिरंग्यानेंमात । घातले मोडून गांवांत ॥ गांव मग आणिला वेजीत । लागली सल्ल्याची मसलत ॥(चाल)॥ घ्या खंडणी म्हणून बोलले मग लखोटे लिहिले । जासुदा हातीं धाडिले । लोक रदबदलीशीं आले ॥ तीन लाखांवर ठरविले । लोक ओलीशीं घेतले । भाऊ माघारे परतले । मिरजेचे गुक्काम केले ॥ भाऊ तासगांवाशीं आले । गणपतीचें दर्शन केलें लोक नगरींचे खुशाल झाले ॥ कडीं तोडे बक्षिसा दिले । मंद्रुपचे देशमुख आले ॥(चाल)॥ गजदंत हत्ती दिला राव देसायाशीं । चौखंडामधें कीत सांगायाशीं । केला भाऊचा पोवाडा मिरजदेशीं ॥ गांव कोल्हापूर ठिकाणा जागा रहिवाशी । कवि जिवाजी पांचाळ आणा ध्यानाशीं ॥ गुरुरायाची कृपा आम्हाला प्रसन्न नागनाथ । डफावर पांच निशाणें त्रिशूळ झळकत ॥तासगांव०॥ ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP