मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| ४ अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा खडर्याची लढाई - ४ पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - अनंतफंदी ( चला - ‘ श्रीकृष्णानें सुदामजीला सोन्याची नगरी दिधली’ - अमृतराय ) Translation - भाषांतर सवाईमाधवराव सवारी भाग्योदय ज्याचे पदरी । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथे पाणी भरी ॥ध्रुपद॥श्रीमंत सवाई नाव पावले । दिव्य तनु जणूं चित्रबाहुलें ॥ विचित्रपुण्योदरी समावलें । नानातें राज्याचे आवले ॥ विधात्याने नेमून ठेविले । बसल्याजागीं कैक छपविले । उन्मत्त जाले तेच खपविले ॥ अतिरथि कूल दोरींत ओविले । जगवायाचे तेच जगविले ॥ मग तमाम शत्रु नागविले । तपसामर्थ्ये अपेश लपविलें ॥ दिल्ली आग्र्यावर झेंडे रोविले ॥ अटक करनाटकांत भोंवले । जिकडे पहावें तिकडे उगवले ॥ माधवराव पुण्याची पाउलें । टिपूसारिखे मुठीत घावले ॥ मेणापरीस मृदु वांकविले । सवाई तेजापुढें धाकले ॥ पुण्य सबळ उत्कृष्ट फांकलें । नानापुढे बुद्धिवान् चकले ॥ कैक त्याची तालीम शिकले । तरी ते अपक्क नाही पिकले । ज्यांणी दहा वीस वर्षे स्वराज्य हांकिलें । श्रीमंतांचे तक्त राखिलें ॥ अक्कलवंत कोठेही न थकले । श्रीमंत गर्भी असतां, एकले ॥ नानांनीं राज्य ठोकून हांकिले । माझे करून महाभाव केले ॥ जहाज बुद्धिबळे जवकलें । यावतकाळपावेतों टिकलें ॥ श्रीमंत पाहून धनवर छकले । छोटेखानी कैक दबकले ॥ जे स्वामीचरणास लुबकले । ते तरले वरकड अंतरले ॥ मीपणांत जे गर्वें भरले । ते नानांनीं हस्तकीं न धरले । ते साहेब सेवेत घसरले ॥ मग त्यांचे पुण्योदय सारले । न जन्मले माते उदरीं । घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली बह्मपुरी । सवाई माधवराव सवारी भाग्योदय ज्याचे पदरीं ॥१॥श्रीमंतांचें पुण्य सबळ कीं । न्य़ून पडेना पदार्थ एकही ॥ महान्न झाले भिन्नमनोदय खिन्न करूनियां शत्रुची शकले । मधें मधें एक चिन्ह उद्भवलें ॥ नबाब झाला सिद्ध, करूं म्हणे राज्य आपण पृथ्वीचें सारें । गलिमाचे मोडून पसारे ॥ वकील धाडूनियां परभारें । हळूच लावले सारे दोरे । म्हणे युद्ध करा धरा हत्यारें । त्यामुळें वीरश्रीच्या मारें ॥ शहर पुण्याच्या बाहेर डेरे । गारपिरावर दिघले डेरे श्रीमंतांला (नी?) जैजैकारें । होळकरास धाडिलें बोलावुन ॥ छोटे मोठे समग्र य़ेऊन । वडिलपणानें जय संपादा ॥ पाटील गेले ते विष्णुपदा । जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा ॥ बहुत शिपायांचा पोशिंदा । त्याच्या नांवें करूनि सनदा ॥ लष्करी एकही नाहीं अजुरदा ॥ त्याचे पदरचे जिवबादादासुद्धां ॥ आणविले परशुरामभाऊ मिरजवाले । नागपुराकडून आले भोंसले ॥ बाबा फडके आपाबळवंत । बजाबाबापू शिरोळकर माधवराव ते ॥ राजेबहादर गोविंदराव पिंगळे । विठ्ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर ॥ गोडबोले राघोपंत जयवंत पानशे ॥ मालोजीराजे घोरपडे ॥ दाजीबा पाटणकर । अष्ट प्रघानांतील प्रतिनिधी । फाकडे मानाजी मागून आले । चक्रदेव नारोपंत भले ॥ दाभाडे निंबाळकर हे उभेच ठेले । रामराव दरेकर चमकले ॥ वकील रामजी पाटील झुकले । मग याशिवाय चुकले मुकले कोण पाह्यला गेले आपले ॥ तमाम पागेपतके बेरोजगारी घेऊनि कुतके । अचाट फौजा मिळून आले ॥ वळून गेले जुळून संगम झाला । तीन लक्षांचा एकच ठेला ॥ त्यामधीं नाना ते कुलकल्ला । होणारी शंकर जाजाला बंदुखानी तोफा गर्नाळा ॥ वाद्यें रणभेरी कर्णाला । गणित नाहीं श्यामकर्णाला मरणाला ना भीत । घोडे पुढें धकावूनी नाना । सहवर्तमान पुण्यांत आले राउत ॥ तमाम दुनिया आली पाह्याला । कन्हया माधवराव फुलांचा झेला । पेशव्यांनी कुच केला । सवेंचि मोंगलही सावध झाला ॥ याचा त्याचा पाण्यत्वरूनि तंटा झाला । तो तंटा त्यानि - व वाढविला ॥ श्रीमंतांनी करूनि हल्ला ॥ घ्या घ्या म्हणून कैक धुडावून दिले लुढावून मोंगल गोगलगाय ॥ करूनियां पृथ्वी देईना ठाय । मोकली धाय करीत हाय हाय ॥ तेव्हा लेंकरा विसरली माय । कैक जरबानें खालीं पाहे ॥ कीं सर्पासन्निध उंदीर जाय । असा मृदु मोंगल केला । शरण आला मग मरण कसे चिंतावें त्याला ॥ उभयतां पक्षीं सल्ला झाला । पुढें मग महाल मुलुख काहीं घेतो देतो श्रीमंताला ॥ ते आपल्याला कोण सांगतो आतां, पुढें जे उडेल मातु । तेव्हां कळेल कीं अमके महाल अमके धातु ॥ पडली पांतु नबाबाला । रहस्य राखून रंग मारला ॥ पुढें ठेविली अस्ता । रस्ता धरून पुण्याचा थाट दुरुस्ता ॥ नबाबावर कंबरबस्ता । फिरून आले वळून एक एक नानापरीच्या वस्ता । सस्ता दाणापाणी वाद्यांसहवर्तमान मश्रुलमुलुख कैद करूनियां श्रीमंतांनी कारागृहीं ठेविला । एथुनी पवाडा समाप्त जहाला ॥ सबशहरीं संगमनेरीं । फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी ॥ श्रीमंतांचे दरबारीं । सवाई माधवराव सवारी भागोदय ज्याचे पदरीं ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP