मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
जसा रंग श्रीरंग खेळले वृं...

सवाई माधवराव - जसा रंग श्रीरंग खेळले वृं...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारांत । तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगांत अति आदरांत ॥ध्रृ०॥
धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले । कीर्त दिगंतरी करून कुळांतिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥ एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले । दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाहीं दरिद्री कुणी उरले ॥ शालिवाहन शक नर्मदेपावत जाउन जळिं घोडे विरले । श्रीमंतांस कारभार देउन ले शरण रिपू पृथ्वीवरले ॥(चाल)॥ महावीर महादजीबाबा हुजराती चे ॥ आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥ केले महोच्छाव खुब मोठया गजरातीचे ॥(चाल)॥ तर्‍हे तर्‍हेचे ख्याला तमाशे बहुत होती दळभारांत । श्रीमंतांचा संकल्प हाच कीं रंग करावा शहरांत ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा । सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधें बेत अधिक कारभार्‍यांचा ॥ मधें मुख्य अंबारि झळाळित मागें ताट अंबार्‍यांचा । चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥ हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा । धुमाधार अनिवार मार भर बंबाच्या फटकार्‍यांचा ॥चाल)॥ नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥ वर्णित भाट यश किर्ति सकल गर्जुन ॥ चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥(चाल)॥ घरोघरी नारी झुरुझुरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारांत । गुलाला गर्दा पेल दुतर्फा रंग रिजविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छंदात । हास्यवदन मन सदय शोभलें शूर शिपाईवृंदांत ॥ दोहों दोहों हाती भरमुठी दिल्हे छत लाल दिसे खुब बुंदांत । तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात । सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशें चवसांत । परिधावी संवत्सरांत फाल्गुन वद्य चतुर्दशी धारांत ॥(चाल)॥ बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥ रंगाचे पाट रस्त्यांत वाहुं लागले । किती भरले गुलालें चौक ओटे बंगले ॥(चाल)॥ कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरांत । पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारांत ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलालें भरून चालती स्वारींत । गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारींत ॥ आपाबळवंतराव खवाशित चौति मिजाजित वारीत । लाल कुसुंबी रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥ कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित । बल्लम बाण बोथाटया सटे लगी वाद्यघोष डिमदारीत ॥(चाल)॥ भले भले एकांडे मधे घोडे घालती । बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥ संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥(चाल)॥ वेत्रपाणि वारिती तरी झाली गर्दी मोठी बुधवारांत ॥ संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥(चाल)॥ वेत्रपाणि वारिती तरी झाली गर्दी मोठी बुधवारांत । झुकत झुकत समुदाय सहित नीट स्वारी आली रविवारांत ॥४॥

आधिंच पुणे गुलजार तशामधें अपूर्व वसला आदितवार । त्यांत कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥ हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार । हास्यवदन राजेंद्रमुखावरि शेला लाविती वारंवार ॥ पाटिला बाबांनी नेउन शिबीरा रंग केला जोरावार । वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥(चाल)॥ उलटली स्वारी मग महिताबा लाउनी । कुरनिसा करति जन वाडयामध्यें जाउनी ॥ दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥(चाल)॥ महादेव गुणिराज फेकिती तान तनन दरबारांत । प्रभाकराचे कवन पसरले सहज शतावधि नगरांत ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP