सखूबाई शिंदीचा पोवाडा - करूनि गेली राज ह्याराज सक...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
करूनि गेली राज ह्याराज सकूबाई । त्या पुण्याला पार नाही ॥ ध्रुवपद ॥ राणोजीराव बाबा होते सुभेदार त्याचे पोटी जन्मले हिर ॥ आपासाहेब सत्त्वधीर ॥ केवळ पाहा ईश्वरअवतार ॥ मधवी बंधू जोतिबा सरदार ॥ जशी काई खर्गाची धार ॥ दत्तमहाराज दिगांबर ॥ नांव पाहा त्याचें दुरवर ॥ कोंती माद्रीचा माद्रीचा अवतार ॥ ऐका दोहीतिहींचा विस्तार ॥ चिमबाईचे पाहा पुत्र सत्वधीर ॥ तुकोजीबाबा गुणगंभीर ॥ माहादजी बावा बावाचें तप थोर ॥ राजझेंडे सृष्टीवर ॥ धुमाळी ॥ ऐसे पांचीजन भाऊ जसे पंडूचे पांडवू ॥ धर्म अर्जुन बळी भिवू ॥ आणिक नकुळ सहदेऊ ॥ तैसे क्षेत्री जिवूं ॥ चौखंडी ज्याचे नाऊ ॥ म्हणविती अष्ट उमरावू ॥ बसविला ज्यांनी बाच्छाऊ तक्तशाई ॥त्यांच्या पुण्याला०॥ ॥१॥
राजलक्षुमी लक्षुमीसी नाही अंत ॥ उदंड पाहा दिधली भगवंत ॥ हत्ती घोडयासी घोडयासी गणित ॥ उदंड पालख्या आणि रथ ॥ आपासाहेब पाहा गेले मारवाडांत ॥ तिथे वैर्यांनी केला घात ॥ दत्ताजी बावा गेले कुळक्षेत्रांत ॥ ते न्हाले धारातीर्थ ॥ ते न्हाले धारातीर्थ ॥ जनकोजी बाबा कोपला भगवंत ॥ नाही लागला त्याचा अंत ॥ राव माहादबाने रोकड ॥ घेतला वडलाचा सूड ॥ काबीज केले मारवाड घेतला फत्तरगड ॥ मोडली गिलज्याची खोड ॥ आपलेसे केले चहूंकड ॥ आपलीसी केली चौकड ॥ रेफिरे हात बांधुनी आला पुढे दिधले परगाणे द्वाही ॥त्याच्या पुण्याल०॥ ॥२॥
लिंबाबाईचें थोर पुण्या ॥ लक्षुमी दिली भगवंतान ॥ कुने गोष्टीचें नाही उण ॥ जानकूबाई लेंक रत्न ॥ जोगूबाई बाईवर दया पर्ण ॥ नांव केले मैनाबाईन ॥ येसूबाई बाई बहुत सुज्ञान ॥ काय मी वर्णू त्याचे गुण ॥ बयासाहेब नित्य करी बोळवण ॥ हंस पुरविली चोकून ॥ बयासाहेबाची सकूबाई वडील सून ॥ मानपानाची धनीन ॥ धुमाळी ॥ मधवी सगुणाबाई ॥ केले राजपुण्य सवाई ॥ तिच्या पुण्यासी जोडा नाही ॥ आणखी भागीरथीबाई ॥ तिची कीर्ती वर्णू मी काई ॥ अन्नछत्र ठाई ठाई ॥ ब्राह्मण भोजन मिठाई ॥ पंक्तीस जेवी गोसावी शास्त्र गाई ॥ तिच्या पुण्या तिच्या पार नाही ॥३॥
निंबाबाई बाई गेल्या सर्गाला ॥ राज्य स्थापिलें सकूबाईला ॥ सगुणाबाई केली तुमचे हवाला ॥ संभाळा भागीर्थीबाईला ॥ फार विनविलें विनविलें ॥ जीव लाव आपुले रयतेला ॥ सुखी राखावें सुखी राखावें अवघ्याला ॥ राज कर आशीर्वाद दिला ॥ सकूबाईनें प्रतिपाळ फार केला ॥ पार नाहीं त्यांच्या पुण्याला ॥ नाथ प्रसन्न हाय बयासाहेबाला ॥ लौकिक नांवाचा झाला ॥चाल॥ धुमाळी ॥ सोहिरे जोडले धुर ॥ अमृतराव निंबाळकर ॥ राणोजी त्याचे कुमर ॥ दिली दादीबाई सत्वर ॥ आणखी आईका सोयर ॥ सेनापती दिगांबर ॥ पाहो सखाराम चातुर ॥ अंबिकाबाईचे घर ॥ अंबिकाचें घर सांगू काई ॥त्या०॥ ॥४॥
राजे घोरपडे घोरपडे पाहा बळीवंत ॥ नाम जाहीर चौमुलूखांत ॥ गोविंदराव राजे त्यासी जाणती समस्त ॥ अहिल्याबाईचे कांत ॥ होते रणबहिरी जसे रणशूर जनांत ॥ कोपला त्यावर भगवंत ॥ काय मी सांगू सांगू हो त्याची मात ॥ रणसंग्रामी झाले शांत ॥ आणि सोहिरे सोहिरे सावंत ॥ राजा रामचंद्र गुणिवंत ॥ तयाचे वंशी राजे खेम सावंत ॥ लक्षुमीबाई दिली तेथा ॥ धुमाळी ॥ लक्षुमीबाईवर ॥ फार होता बयाचा प्यार ॥ इसमत नव्हत्या क्षणभर ॥ मोठा राज्याचा घोर ॥ पुसावा समाचार ॥ धाडी पत्रे वरचेवर ॥ कसे करील ईश्वर ॥ कधी ऐकेन त्याचे बरे कधी ऐकेन ॥ त्याचे बरोबरी सोई ॥त्या०॥ ॥५॥
धर्मराज पाहा केले बाईन ॥ नित्य करी दानपुन ॥ देव देवार्चन तीन वेळां पुराण ॥ वाची पुराणिक ब्राह्मण ॥ सर्वे अधिकारी चिचोरे दिवाण ॥ तयाचे हाती देणघेण ॥ विठलराव बापूवर दया पूर्ण ॥ फडणीसी वडलांपासून ॥ एकाएककी कसे आले बाईस दुखण ॥ उपाय चालेना कोणे गोष्टीन ॥ उदंड औषध देती वैद्य ब्राह्मण ॥ कसें केलें भगवंतान ॥ धुमाळी ॥ सामगांवा पत्र धाडिले ॥ आपासि बोलाविले ॥ त्यासी निरवानिरव केले ॥ ब्राह्मणांसि दान वांटिले ॥ गाई ह्यैसी शाल दुशाल पलंग न्हाल्या तबक देविले ॥ ब्राह्मणाच्या हवालीं केलें ॥ बाईने तीर्थ घेतलें ॥ बाईने तीर्थ घेतलें ॥ बाईनें तीर्थ घेतलें सुख होई ॥त्या०॥ ॥६॥
पुस वद्य होती तीळसंक्रांत ॥ दिशा धुंद केल्या समस्त ॥ तुटला तारा दोपारच्या अंमलांत ॥ अचंबा करिती जन बहुत ॥ उगवला दिन गुरुवार चहुथ ॥ राजस्वरी वैद्य आला तिथ ॥ दिले औषध औघ्याच्या देखत ॥ पाहिली नाडी धरून हात ॥ प्राण झाला व्याकूळ व्याकूळ त्या घटकेंत ॥ सोडले अवघे गणगोत ॥ गेली निजधामा सकूबाई श्रीमंत ॥ एकच झाला आकांत ॥ रोजना करी दादीबाई ॥ ह्यणे देवा झाले काई ॥ आह्या लोक आक्रोश करी ताईबाई ॥ निनाई गेली टाकूनी वत्से गाई ॥ अशी ह्यणे लक्षुमीबाई ॥ कसें झाज बुडालें डोहीं ॥ अंधकार पडला दुहीं शास्त्र पाही ॥त्याच्या०॥ ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP